News

जळगाव: भारतातील कृषी व सुक्ष्म सिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2018-19 च्या तिसऱ्या तिमाहीचे (नऊ महिन्यांचे) लेखा परीक्षण न केलेले स्वतंत्र व एकत्रित निकाल मुंबई येथे नुकतेच जाहीर केले. तिसऱ्या तिमाहीचा अर्थात नऊ महिन्यांचा कर, व्याज व घसारापूर्व नफा 13.97 टक्क्यांनी वाढून ते 821.3 कोटी रूपये व तिसऱ्या तिमाहीचा कर, व्याज व घसारापूर्व नफा 272.2 कोटी रूपये जैन इरिगेशनने साध्य केला. तिसऱ्या तिमाहीचा करपश्चात नफा 36 टक्क्यांनी वाढून तो 91.5 कोटी रूपये तर नऊ महिन्यांचा करपश्चात नफा 198.1 कोटी रूपये कंपनीने नोंदवला आहे.

Updated on 14 February, 2019 8:18 AM IST


जळगाव:
भारतातील कृषी व सुक्ष्म सिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2018-19 च्या तिसऱ्या तिमाहीचे (नऊ महिन्यांचे) लेखा परीक्षण न केलेले स्वतंत्र व एकत्रित निकाल मुंबई येथे नुकतेच जाहीर केले. तिसऱ्या तिमाहीचा अर्थात नऊ महिन्यांचा कर, व्याज व घसारापूर्व नफा 13.97 टक्क्यांनी वाढून ते 821.3 कोटी रूपये व तिसऱ्या तिमाहीचा कर, व्याज व घसारापूर्व नफा 272.2 कोटी रूपये जैन इरिगेशनने साध्य केला. तिसऱ्या तिमाहीचा करपश्चात नफा 36 टक्क्यांनी वाढून तो 91.5 कोटी रूपये तर नऊ महिन्यांचा करपश्चात नफा 198.1 कोटी रूपये कंपनीने नोंदवला आहे.

निकालाची ठळक वैशिष्टये:

एकीकृत उत्पन्नात तिसऱ्या तिमाहीत 9.22 टक्क्यांची वाढ होऊन ते 2037.7 कोटी रूपये इतके झाले. तिसऱ्या तिमाहीत एकल उत्पन्न 8.84 टक्क्यांनी वाढून ते 1098.5 कोटी रूपये झाले. तिसऱ्या तिमाहीत एकीकृत कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात 7.91 टक्क्यांनी वाढ झाली व तो 272.2 कोटीपर्यंत पोहोचला. तिसऱ्या एकल कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात 10.56 टक्के वाढ होऊन तो 201.1 कोटी रूपये नोंदवला. तिसऱ्या तिमाहीत एकीकृत करपश्चात नफा 35.95 टक्क्यांनी वाढून तो 91.5 कोटी रूपये झाला तर तिसऱ्या तिमाहीत करपश्चात एकल नफा 2.63 टक्क्यांनी घटून 63 कोटी रूपये झाला. कंपनीकडे आतापर्यंत एकूण रु. 5192.8 कोटी मागणी प्राप्त झालेली आहे. पॉलीमरच्या किमती कमी झाल्या तरी विक्रीची वाढ कायम राहिली. तिसऱ्या तिमाहीत कर, व्याज व घसारापूर्व नफ्याचे प्रमाण योग्य पद्धतीने केलेल्या विक्रीमुळे चांगला वाढला.

तिसऱ्या तिमाहीचा आणि 31 डिसेंबर 2018 रोजी संपणाऱ्या 9 महिन्यांचा आर्थिक निकाल जाहीर करतांना आम्हाला आनंद होत आहे. तिसऱ्या तिमाहीत जैन इरिगेशनने भारत आणि भारताबाहेरील व्यवसायात आणि नफ्यात अपेक्षित वाढ नोंदविली. खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आम्हाला खात्री आहे की त्यामुळे येणाऱ्या तिमाहींमध्ये नफ्यावर सकारात्मक परिणाम होईल. या कठीण काळात कंपनी व्यवस्थापन शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनी पर्यावरण, समाज आणि प्रशासन (इएसजी) आदी घटकात प्रभावी नेतृत्व करीत आहे. यासाठी शेतकऱ्यांचा भक्कम पाठिंबा आणि विश्वास कंपनीने मिळवला आहे. शाश्वततेचे लक्ष्य कंपनी साध्य करेल. उर्वरीत काळात आम्ही आमची लक्ष्ये साध्य करण्याबाबत सकारात्मक वाटचाल करू आणि विविध व्यवसायात व विविध भौगोलिक क्षेत्रात चांगली कामगिरी नोंदवू.

English Summary: Jain Irrigation revenues profits after tax of Rs 91.5 crore in third quarter
Published on: 14 February 2019, 08:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)