गेल्या काही दिवसांपासून राज्यात महावितरणकडून विजतोडणी केली जात आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे राज्यात शेतकरी आंदोलन करत आहेत. असे असताना आता माढा तालुक्यातील चव्हाणवाडी येथील 88 वर्षीय सुभद्राबाई यांनी (MSEB) महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला आहे. यामुळे याची चर्चा सध्या रंगली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना काय समजणार पिकांच आणि शेतकऱ्यांचे नातं काय असत, अंतिम टप्प्यात विद्युत पुरवठ्याअभावी जर नुकसान होणार असेल तर जगायचं कसं असा प्रश्न आजीबाईंनी उपस्थित केला आहे.
यावेळी आजीबाई म्हणाल्या की, तुमची कारवाई होत असली तरी आमचा जीव जाण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी टेंभुर्णी येथे सुरु असलेल्या आंदोलनात कमालीची शांतता पसरली होती. चव्हाणवाडीच्या शिवारातलं वास्तव आजीबाई सांगत होत्या आणि आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी आणि कर्मचारी हे त्यांचे गऱ्हाणे ऐकूण घेत होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती. सध्या महावितरणच्या कारभारामुळे उत्पादनात घट होईल असे चित्र झाले आहे.
टेभुर्णीच्या महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आक्रोश ठिय्या आंदोलन केले होते. संजय पाटील भिमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले होते.दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढुन कुलूप ठोकुन घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण आता महावितरणच्या कारवाईमुळे ऊस आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे.
आजीबांईंच्या या आंदोलनानंतर तरी या भागातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार का हे येणाऱ्या दिवसात समजेल. 88 वर्षीय महिला शेतकरी असलेल्या सुभद्राबाई यांनी वीज कनेक्शनसाठी अनामत रक्कम महावितरणकडे अदा केली आहे. असे असताना त्यांना अद्यापही हक्काची लाईटच मिळालेली नाही. तर दुसरीकडे कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने पिके करपून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
Published on: 04 March 2022, 02:54 IST