सध्या उन्हाळा जाणवू लागला असून उन्हाळ्यातील पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. असे असताना आता कलिंगडाचे दर वाढत आहे. शिवाय बाजारपेठाही खुल्या असल्याने यंदा अच्छे दिन येणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. कलिंगड हे हंगामी पीक आहे. (Seasonable Crop) लागवडीपासून केवळ अडीच महिन्यामध्ये ते विक्रीयोग्य होते. कालावधी कमी असला तरी योग्य काळजी घेतली तर यंदा कलिंगड उत्पादक शेतकरी हे मालामालच होणार आहेत. यामुळे योग्य व्यवस्थापन केले तर शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळणार आहेत. यामुळे आता हे पीक घेतले तरी पैसे मिळू शकतात.
रमजान ईद, कडाक्याचे ऊन असे हंगाम साधून कलिंगडचे उत्पादन घेतले जाते. सर्वाधिक उत्पादन हे खानदेशात घेतले जाते. कलिंगड उत्पादक शेतकरी हे गेल्या दोन वर्षापासून संकटात आहेत. ऐन (Watermelon) कलिंगड बाजारात दाखल होणार तेवढ्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसला होता.
कलिंगडला शेतकऱ्यांच्या बांधावर 8 ते 11 रुपये किलो असा दर मिळत आहे. उत्पादनावरील मेहनत, खर्च हे सर्व पकडून किमान 7 ते 8 रुपये जरी दर मिळाला तरी शेतकऱ्यांचा यामध्ये चांगले पैसे मिळतात. यंदाची स्थिती वाढती मागणी आणि भविष्यात जर उन्हाचा कडाका वाढला तर अपेक्षेपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांना कलिंगड लागवड करण्यापूर्वी शेतजमिनीची मशागत करणे गरजेचे आहे. उशीर झाला असेल तर थेट नर्सरीमधून रोप आणून केलेली लागवड फायदेशीर होणार आहे.
काळ्या पातीचे, हिरव्या पातीचे असे वेगवेगळे वाण असून शेतजमिनीनुसार याची निवड करावी लागणार आहे. मल्चिंग टाकूनच लागवड करणे गरजेचे आहे. कारण यामुळे किड-रोगराईचा प्रादुर्भाव होणार नाही. शिवाय ठिबकचा वापर करुनच पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यामुळे चांगले उत्पादन आणि वजन देखील जास्त मिळणार आहे. तसेच शेणखत देखील टाकणे गरजेचे आहे.
Published on: 08 March 2022, 03:50 IST