News

धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. धाराशीव जिल्ह्यातील वाडीबामणी (Wadibaman) या गावातील बाबासाहेब अशोक उबरदंड या शेतकऱ्याचे एका तासात तब्बल 25 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. गारपीटीमुळं ड्रॅगन फ्रुटसह टरबूज आणि ऊसाच्या पिकाचं नुकसान झालं आहे.

Updated on 12 April, 2023 9:52 AM IST

धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. धाराशीव जिल्ह्यातील वाडीबामणी (Wadibaman) या गावातील बाबासाहेब अशोक उबरदंड या शेतकऱ्याचे एका तासात तब्बल 25 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. गारपीटीमुळं ड्रॅगन फ्रुटसह टरबूज आणि ऊसाच्या पिकाचं नुकसान झालं आहे.

यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच शेतात ठेवलेल्या सोयाबीनसह हरभरा देखील पाण्यात भिजलं आहे. पाऊस आणि गारपीट सुरु झाल्याचे शेतकरी बाबासाहेब अशोक उबरदंड आणि त्यांच्या पत्नी साधना बाबासाहेब उबरदंड यांनी सांगितले. एका तासाभरापूर्वी भारी दिसणार टरबुजाचं पिकं क्षणात उध्वस्त झाल्याची माहिती उबरदंड यांनी दिली.

यावेळी पाऊणतास गारपीट झाली. यामध्ये टरबुजासह ड्रॅगन फ्रुट आणि ऊसाचं मोठं नुकसान झाल्याचं उबरदंड यांनी सांगितलं. कर्ज काढून हे पिकं उभारलं होतं. मुलांच्या शिक्षणाचा मोठा खर्च आहे. अशातच हे अस्मानी संकट आल्यानं शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आल्याचं पाहायला मिळालं.

Tractor News: हे दोन ट्रॅक्टर ठरतील शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदान, वाचा किंमत आणि खासियत..

बँकेचं कर्ज, बँकेत सोनं देखील गहान ठेवलं आहे. अशातच हे संकट आल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. शिक्षणासाठी आता पुढे पैसे नाहीत. एक मुलगी इंजीनियरिंग आहे. एकीची दहावी झाली आहे. तसेच मुलगा बी एस्सी अॅग्री करत आहे. आता या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा असा प्रश्न उबरदंड कुटुंबापुढे उभा राहिला आहे.

Drone: ड्रोन 1 दिवसांत 30 एकर शेतीवर फवारणार औषध, सरकारकडून अनुदान

दोन एकरमध्ये ड्रॅगन फ्रुटचे 10 टन उत्पादन काढण्याचे ठरवले होते. 150 रुपयांचा दर मिळाला असता तरी 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असते असे शेतकरी उबरदंड यांनी सांगितले. सहा एकर ज्वारीत सगळीकडे पाणी आहे. तीन एकर ऊसात पाणी आहे, तर दोन एकर कलिंगड वाया गेल्याचे उबरदंड यांनी सांगितले.

2 एकरात 3 महिन्यात 6 लाखांच उत्पादन, सेंद्रीय शेतीची कमाल...
शेतकऱ्यांनो माती परीक्षण प्रयोगशाळा व्यवसाय सुरू करा; कमवाल लाखों रुपये
कोल्ड स्टोरेज व्यवसायाच्या माध्यमातून साधा आर्थिक प्रगती, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

English Summary: It was not done in an hour! 25 lakhs loss in one hour, the farmer told the thrill
Published on: 12 April 2023, 09:52 IST