News

अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथील मुंबादेवी सहकारी दुध उत्पादक संस्थेतर्फे (Mumbadevi Cooperative Milk Producers' Association of Adarsh ​​village Hivre Bazar) नुकतेच वार्षिक बोनस वाटप करण्यात आले. संस्थेला झालेल्या वार्षिक नफ्यातून सालाबादप्रमाणे यंदाही २ रुपये प्रतिलिटर प्रमाणे सभासदांना बोनस मिळाला.

Updated on 25 October, 2022 10:59 AM IST

अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथील मुंबादेवी सहकारी दुध उत्पादक संस्थेतर्फे (Mumbadevi Cooperative Milk Producers' Association of Adarsh ​​village Hivre Bazar) नुकतेच वार्षिक बोनस वाटप करण्यात आले. संस्थेला झालेल्या वार्षिक नफ्यातून सालाबादप्रमाणे यंदाही २ रुपये प्रतिलिटर प्रमाणे सभासदांना बोनस मिळाला.

यामुळे शेतकरी समाधानी आहेत, यामध्ये अनेकांना लाखोंमध्ये बोनस मिळाला आहे. संस्थेचे सभासद रघुनाथ रंगनाथ बांगर यांना यंदा सर्वाधिक १,३१,२०६ रुपये बोनस मिळाला, तर रोहिदास हरिभाऊ ठणगे यांना १,१२,९६१; माधव रंगनाथ बांगर यांना १,००,१७१ रुपये इतका बोनस मिळाला. बाकी सर्व सभासदांना त्यांनी वर्षभर घातलेल्या दुधाच्या प्रमाणात बोनस मिळाला.

यामुळे याची सध्या स्गकीकडे चर्चा सुरू आहे. अनेक राजकीय पुढारी मंडळींनी सहकारी दूध संस्थांची चळवळ मोडीत काढली, मात्र याला अपवाद ठरला आहे. गावोगावी पसरलेल्या दूध संस्था मग बंद पडल्या. मात्र, नगर तालुक्यातील हिवरे बाजार येथे ही संस्था कार्यान्वित आहे. आणि ती सभासदांचे हित बघून त्यांना चांगल्या प्रकारे पैसे मिळवू देत आहे.

शेतकऱ्यांनो तुम्ही असे का नाही करत? हा पठ्ठया विकतोय 100 रुपये किलोने ऊस, आता शेतकऱ्यांनाच व्यापारी व्हावे लागेल..

या संस्थेचे एकूण १३० सभासद असून यंदा रक्कम रुपये २०,९९,२२५ एकूण बोनस वाटण्यात आला. हिवरे बाजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून २७० सभासदांना १४ टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात आले. संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ८,८८,८५३/- नफा झाला असून त्या नफ्यातून वाटप करण्यात आले.

'गोलू' चा पॅटर्नच वेगळाय! खाद्य आणि किंमत वाचून येईल चक्कर..

दरम्यान, पद्मश्री पोपटराव पवार, सौ. विमल दीपक ठाणगे (सरपंच हिवरे बाजार) , छबुराव ज्ञानदेव ठाणगे (चेअरमन, हिवरे बाजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था), रामभाऊ कृष्णा चत्तर (व्हा. चेअरमन, बाबासाहेब गुंजाळ (व्हा. चेअरमन, मुंबादेवी सहकारी दुध संस्था), सखाराम पादीर, अर्जुन पवार, दामोधर ठाणगे यांच्या हस्ते बोनस वाटप करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या;
नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत केली 'दिवाळी' साजरी
सितरंग चक्रीवादळ आज धडकणार, 7 राज्यांना फटका बसणार
'साखर कारखाना हे मंदिर आणि शेतकरी हे देव'

English Summary: It should be a cooperative organization! Lakhs of bonus given to farmers...
Published on: 25 October 2022, 10:59 IST