News

सध्या राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांची घरे, वाहने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Updated on 19 July, 2022 5:14 PM IST

सध्या राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांची घरे, वाहने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यात पावसामुळे अशीच काहीशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. या भागात केवळ आर्थिक नुकसान नाही तर जीवितहानीही झाली आहे. या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे.

मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे आगामी काळात पेरण्यानंतर बुड धरलेली ही पिके पावसात उभी राहतील की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे. यात जवळजवळ ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.८ ते १८ जुलै पर्यंत बरसणाऱ्या जोरदार पावसामुळे साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना पावसाचा फटका बसला आहे.

जालना ५० हेक्टर, परभणी १,२०० हेक्टर, हिंगोली १५ हजार ९४४ हेक्टर, नांदेड ३ लाख ३० हजार ८७९ हेक्टर, तर लातूर जिल्ह्यात १५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. ही माहिती विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे. अतिवृष्टीमुळे जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ४७६ हेक्टर जमीन वाहून गेली आहे.

फळपिकांचे ५८ हेक्टर, बागायत ५ हजार ४९९ हेक्टर तसेच जिरायत ३ लाख ३२ हजार ५३१ हेक्टर एवढे पिकांचे नुकसान झाले आहे. लातूरमध्येही पावसामुळे हैराण झाले आहेत. जवळपास १८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार या भागातील नागरिकांसाठी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इंद्रदेवाला शिक्षा झालीच पाहिजे; तक्रार पत्र व्हायरल, पत्रातील कारण वाचून तुम्ही...

जीवितहानी
या भागात ८ जुलैपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात १० जण वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. तर
२४ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात बऱ्याच दुर्घटना घडल्या आहेत.

भिंत पडून एकजण दगावला आहे. मुक्या प्राण्यांनीही आपला जीव गमावला आहे. २९८ लहान-मोठी दुधाळ जनावरे, तर १२० ओढकाम करणारी जनावरे दगावली आहेत. इतकंच नाही तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय ७७९ कच्ची, तर तीन पक्की घरे पावसाने पाडली आहेत.

महत्वाच्या बातम्या:
लाखो रुपये कमवून देणारं पावसाळ्यातील हक्काचे पीक, जाणून घ्या तिळाची लागवड
आता अंतराळातही रेल्वे प्रवास; पृथ्वी, चंद्र आणि मंगळ यांना जोडणारी रेल्वे लाईन

English Summary: It rained, the enemy of the farmers; Lakhs of hectares of crops under water, seeks help from the government
Published on: 19 July 2022, 05:14 IST