News

सध्या शेती करणे म्हणजे बेभरोशी काम झाले आहे. अनेक संकट शेतकऱ्यांवर येत असतात. गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या आकड्यांवरून याबाबत आपल्याला अंदाज येईल. आता अशीच भयानक परिस्थिती केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर केळीच्या बागा सोडण्याची वेळ आली आहे.

Updated on 15 January, 2022 11:50 AM IST

सध्या शेती करणे म्हणजे बेभरोशी काम झाले आहे. अनेक संकट शेतकऱ्यांवर येत असतात. गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या आकड्यांवरून याबाबत आपल्याला अंदाज येईल. आता अशीच भयानक परिस्थिती केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर केळीच्या बागा सोडण्याची वेळ आली आहे. तोडणीच्या अवस्थेत आलेली केळी सध्या या शेतकऱ्यांना तोडायला सुद्धा परवडत नाही. यामुळे केळी पिकून खराब होऊ लागली आहे. गेवराईच्या श्रीपत अंतर्वाला गावच्या वैजनाथ वाकळे यांची एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च करून त्यांनी ही बाग वाढवली.

असे असताना आता मात्र विक्रीच्या वेळेस या केळीला दीडशे ते दोनशे रुपये क्विंटल एवढा भाव मिळतोय त्यामुळे त्यांनी बाग तोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती. यावर्षी मात्र केळीचा बाजार उठल्याने शेतात असा केळीचा सडा पडलाय. पूर्वी बाराशे ते पंधराशे रुपये क्विंटलचा भाव मिळणाऱ्या केळीला आता कवडीमोल भाव मिळत असल्याने भानुदास वाकळे यांना आपल्या तीन एकरावरची केळी जनावरांसमोर टाकावी लागत आहे.

अनेकांच्या रानात ही केळी पूर्णपणे पिकली असून ती तोडली जात नाही. यामुळे डोळ्यासमोर आपले नुकसान हे शेतकरी सहन करत आहेत. येथील गेवराई तालुक्यात अनेक शेतकरी दरवर्षी केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. तसेच चांगले उत्पन्न काढून ते लाखो रुपये देखील कमवतात. यावर्षी मात्र केळीला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागा काढून टाकल्या आहेत. तसेच ज्यांचा माल आता तोडणीला आला आहे त्यांनी तो सोडून दिला आहे. सध्या केळीला केवळ दीडशे ते दोनशे रुपये क्विंटलला भाव आहे.

यामुळे आता लाखोंचा खर्च वाया जाणार आहे. या केळीसाठी केलेला खर्च सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही. यामुळे जोरात असलेल्या बागा सुद्धा शेतकरी काढून टाकत आहेत. यामुळे आता हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मोठ्या कष्टाने त्यांनी या बागा फुलवल्या होत्या. मात्र आता त्यांच्यावर मोठे संकट आले आहे. अवकाळी पावसातून मोठा खर्च करून त्यांनी कर्ज काढून या बागा जगवल्या आहेत. व्यापारी मात्र याचा फायदा घेऊन पैसे कमवत आहेत.

English Summary: It is unaffordable to remove bananas farmar
Published on: 13 January 2022, 01:08 IST