News

मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी एकूण १४ हजार ५०९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. पहिल्या सत्राची वेळ सकाळी ९.३० ते ११.३० (पेपर – ०१) आणि दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी २.३० ते ४.३० (पेपर – ०२) अशी आहे.

Updated on 14 June, 2024 10:44 AM IST

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC) २०२४ ही दि. १६ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी एकूण १४ हजार ५०९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. पहिल्या सत्राची वेळ सकाळी ९.३० ते ११.३० (पेपर – ०१) आणि दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी २.३० ते ४.३० (पेपर – ०२) अशी आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने यापूर्वीच निर्गमित केलेल्या ३० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या लेखी सूचनेनुसार परीक्षार्थींनी आपल्या नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास (३० मिनट) अगोदर हजर राहणे अनिवार्य केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थींनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार परीक्षा केंद्रावर अर्धा तास (३० मिनिट) अगोदर उपस्थित रहावे.

English Summary: It is mandatory for the candidates to attend the exam center half an hour before for the UPSC pre-examination
Published on: 14 June 2024, 10:44 IST