News

राज्यात सध्या गेल्या काही दिवसांत गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या बद्दलची शेतकऱ्यांची चिंता काहीशी मिटली होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, याविषयीचे वृत्त कृषीनामाने दिले आहे.

Updated on 24 February, 2021 4:01 PM IST

राज्यात सध्या गेल्या काही दिवसांत गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या बद्दलची शेतकऱ्यांची चिंता काहीशी मिटली होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, याविषयीचे वृत्त कृषी नामाने दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र या वातावरणात बदल होण्याची शक्यता असून, पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरुवातीच्या दिवसांमध्ये हवामान बदलणार असून, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत पाऊस पडणार आहे.१६ ते २० फेब्रुवारीदरम्यान या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा अवकाळी पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व पर्जन्य नसेल. कारण मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात तापमान एका निश्चित मर्यादेच्या वर गेल्यावर होते.

 

हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संथ्या असलेल्या स्कायमेट वेदरचे प्रमुख शास्त्रज्ञ महेश पालावल यांनी सांगितले की, देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगाणा  आणि तामिळनाडू या राज्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागात पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर पूर्व मध्य प्रदेश आणि त्याच्या लगतच्या छत्तीसगड तसेच विदर्भाच्या वर एक चक्रिवादळी हवांचे क्षेत्र विकसित होऊ शकते.

 

या माध्यमातून तेलंगनामधून दक्षिण तामिळनाडूपर्यंत एक ट्रफ विकसित होऊ शकते. या दोन्ही हवामानाच्या परिस्थितीमुळे देशातील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून बाष्प देशातील भूभागावर येईल त्यामुळे हवामान बिघडून पाऊस पडू शकतो.

English Summary: It is likely to rain in the state from February 16 to 20 12 feb
Published on: 12 February 2021, 11:32 IST