News

राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजेच ई-नाम प्लॅटफॉर्मची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2016 ला केली होती. या पाच वर्षात केंद्र सरकारने जवळ 585 बाजार समित्या ई-नाम शी जोडले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यानिमित्त ई-नाम प्लेट फार्मचा विस्तार करणार असल्याची माहिती दिली आहे.

Updated on 15 April, 2021 5:54 PM IST

राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजेच ई-नाम प्लॅटफॉर्मची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2016 ला केली होती. या पाच वर्षात केंद्र सरकारने जवळ 585 बाजार समित्या ई-नाम शी जोडले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यानिमित्त ई-नाम प्लेट फार्मचा विस्तार करणार असल्याची माहिती दिली आहे.

ई -नाम  प्लॅटफॉर्मचा फायदा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये उपयोगी ठरला असे तोमर म्हणाले. ई-नाम योजना शेतकरी कृषी व्यापार संघ यांच्याकडून राबवली जाते. सरकार ही योजना 200 बाजार समित्यांमध्ये लागू करणार आहे तर पुढील वर्षी 215 बाजार समिती ई नामशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आह,  असे नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.

  ई नाम म्हणजे काय?

 लोकांच्या ऑनलाईन विक्रीसाठी देशभरात कृषी बाजार समिती उघडल्या. इंटरनेटच्या माध्यमातून देशातील विविध राज्यात असलेल्या कृषी उपज बाजार समितीच्या नावाखाली देशातील 585 बाजार समित्या जोडला गेला. संपूर्ण देश हा एक बाजारपेठ बनला पाहिजे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुठल्याही वस्तू चांगल्या किमतीवर नोंदणी करून चांगले भाव विक्री करू शकतो. शेतकरी आणि खरेदीदार यांच्यामधील दलालांची मध्यस्थी इ नाम ने संपुष्टात आणली आहे. या योजनेचा फायदा हा शेतकऱ्यांनाच न होता ग्राहकांनाही होतो.

 

ई-नामच्या  नव्या सुविधा

 या प्लॅटफॉर्म दारे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री सोबत हवामानाची इत्थंभूत माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे काम उदाहरणार्थ पिकांची कापणी कधी करावी खिचडी कामांचे नियोजन करता येणार आहे. या पोर्टलवर आतापर्यंत 1.70 कोटी शेतकऱ्यांनी तर 1.63 लाख व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे.

 

ई-नाम पोर्टल वर नोंदणी कशी करावी?

  सर्वप्रथम सरकारचे अधिकृत संकेतस्थळ www.enaam gov.in वर जावे लागते. त्यानंतर ही नोंदणी साठी अर्ज करावा लागेल. त्यामध्ये शेतकरी पर्याय दिसेल मग आपल्याला आपला इमेल आयडी द्यावा लागतो. त्यामध्ये तुम्हाला ईमेल द्वारे लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल. त्यानंतर आपणास ईमेल आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. आपण आपल्या केवायसी कागदपत्रांद्वारेया संकेतस्थळावर अर्ज करून डॅशबोर्डवर नोंदणी करू शकतात.

English Summary: It is beneficial to double the income of farmers - Union Agriculture Minister
Published on: 15 April 2021, 05:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)