सध्या राज्यात अज्ञात चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे. अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे शटर आणि बाजूचे लोखंडी दार उचकटून शेतीपयोगी साहित्य असा एकूण तब्बल २ लाख ३६ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. अहमदपूर एमआयडीसी हगदळ शिवारात ही घटना घडली आहे. मोहन बापूराव क्षीरसागर या शेतकऱ्याचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे.
२ ते ३ जुलैदरम्यान ही घटना घडली आहे. याबाबत सोमवारी त्यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्प्रिंकलरचे पितळी ३१ नौजल, पाइप आणि हरभऱ्याचे ८२ कट्टे असा एकूण २ लाख ३६ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला आहे. त्यामुळे आता शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
मध्यंतरी उस्मानाबाद जिल्ह्यातून एका अज्ञात व्यक्तीने घुगी येथील एका गोदामाचा पत्रा उचकटून ५० किलो वजनाची सोयाबीनची ३५ पोती आणि हरभऱ्याची १५ पोती चोरून नेली होती. २ जुलै ला पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. घुगी येथील बबन जावळे यांचे घुगी शिवारात गोदाम आहे. या गोदामाचा पत्रा उचकटून अज्ञात व्यक्तीने सोयाबीनची आणि हरभऱ्याची पोती चोरी केली आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच; धक्कादायक आकडेवारी आली समोर
आता या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच आर्थिक नुकसान होत आहे. यावर लवकरात लवकर मार्ग निघणे गरजेचे आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
PM Kisan Yojana : कामाची बातमी.! 'या' तारखेला बँक खात्यात येणार 12 व्या हप्त्याचे पैसे
अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 लाख देणारच! शेतकऱ्यांसाठी 15 लाखांची घोषणा..
Published on: 06 July 2022, 05:26 IST