आयएसएस फॅसिलिटी सर्विसेस इंडिया ही कंपनी डेन्मार्कच्या आयएसएस समूहाची उपकंपनी येणाऱ्या दोन वर्षांमध्ये भारतात तब्बल 25 हजार पेक्षा जास्त लोकांना नोकरी देऊ शकते.
येणाऱ्या कालावधीमध्ये महसूल यामध्ये दुप्पट वाढ आणि रोजगार निर्मितीचे लक्ष असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. या अंतर्गत पुढील येणाऱ्या दोन वर्षांमध्ये 25 हजारांपेक्षा अधिक रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. जर या कंपनीची पार्श्वभूमी पाहिली तर 2005 या वर्षी या कंपनीने भारतात प्रवेश केला होता. या कंपनीचे जागतिक उत्पन्न 71 अब्ज डॅनिश क्रोन इतके आहे.एवढेच नाही तर वेगवेगळ्या देशांमध्ये या कंपनीचे 3लाख 50 हजार पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.
या विषयी बोलताना आयएसएस सर्विसेस इंडियाचे मुख्याधिकारी अक्ष रोहतगी यांनी पी टी आय शीबोलताना म्हटले की सध्या स्थितीत कंपनीच्या भारतात 800 ग्राहक कंपन्या असून 4500 ठिकाणी आमच्या ऑफिस आहे. तसेच 50 हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. सध्या भारतातील 23 राज्यांमध्ये कंपनीचा विस्तार झाला आहे. कोरोनामुळे कंपनीला गेल्या दोन वर्षात मोठा फटका बसला मात्र त्यातून आम्ही आता सावरत असून डबल महसूल आणि 25 हजार नोकऱ्यांचे आमचे उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी रोहतगी यांनी दिली.
कोरोनामुळे सर्व ऑफिस देखील बंद होते याचा फटका हा आम्हाला बसला. सेवांमध्ये खंड पडल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले परंतु येणाऱ्या काळातील नुकसान भरून काढण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही रोहतगी यांनी म्हटले.
Published on: 07 March 2022, 10:12 IST