मुंबई: इस्राईलचे महावाणिज्यदूत याकोव्ह फिंकेलस्टेइन यांनी आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन महाराष्ट्र व इस्राईल कृषी सहकार्या संदर्भात चर्चा केली. यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त सचिन्द्रप्रताप सिंह उपस्थित होते. महाराष्ट्रातील कृषी प्रकल्पांसाठी इस्राईलचे सहकार्य घेण्यास राज्य शासन इच्छुक आहे, असे श्री. पाटील यांनी महावाणिज्यदूत फिंकेलस्टेइन यांना सांगितले.
इस्रायल सरकार आणि भारत सरकारच्या भागीदारीतून ‘इंडो-इस्राईल ॲग्रीकल्चर प्रोजेक्ट’ (IIAP) अंतर्गत महाराष्ट्रात 4 इंडो-इस्राईल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात आली आहेत. या सेंटरच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी कृषी विषयक प्रशिक्षण सत्रांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच या सेंटरसाठी महाराष्ट्र शासनाकडून अधिक निधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे श्री. पाटील यावेळी म्हणाले.
Published on: 18 October 2018, 06:07 IST