News

सर्वप्रथम आपण हे पाहूया की आपण ज्या प्रोब्लेमचे सोल्युशन शोधतोय तो खरतर प्रोब्लेमपण आहे कि नाही? राग करणे प्रथमतः चुकीचे नाही.

Updated on 08 May, 2022 7:52 PM IST

चुकीचे असते ते आपण ज्या पद्धतीने आपला राग बाहेर येऊ देतो तो मार्ग. आपण राग कधी करतो? जेव्हा आपल्या मनासारखे होत नाही आणि आपल्याला प्रकर्षाने वाटते की तसे व्हावे तेव्हा!आपला टीव्हीवर आवडता कार्यक्रम येतो आणि तेव्हाच लाईट जाते लगेच आपल्याला राग येतो. घरात सगळे टॉवेल ओले असतील तर आपल्याला राग येतो. आपल्याला कोणी काही बोलले तर लगेच आपल्याला राग येतो. कोणाशी मतभेद झाले लगेच राग येतो. कोणी आपले ऐकले नाही आपल्याला लगेच राग येतो.ह्या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट सामाईक असते ती म्हणजे, "आपल्या मनासारखे होत नाही आणि आपल्याला प्रकर्षाने वाटते की तसे व्हावे तेव्हा!".मग हा प्रोब्लेम आहे का?मी सांगेन की हा प्रोब्लेम आहे पण मी हे सांगणार नाही की तुम्ही राग नका करू, टेक इट इजी!!, चिल्ल ब्रो!!. खरतर प्रोब्लेम दुसराच आहे!!आपल्या मेंदूचे प्रत्येक घटनेला प्रतिसाद देण्याचे निश्चित मार्ग ठरलेले असतात. तहान लागली पाउले आपोआपच स्वयंपाकगृहाकडे वळतात. मोबाईलमध्ये आपण सतत एकाच प्रकारचा pattern फोल्लो करत असतो. फोन आला की प्रत्येक वेळेस एकाच स्टाईलमध्ये बोलत असतो.मेंदूबद्दलचा सुवर्ण नियम ह्या नियमाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही आधार आहेत.

जी गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा करतात ती आपल्या मेंदूसाठी एक फिक्स्ड गोष्ट बनते ज्याला मेंदूत ती गोष्ट Hardwired झाली असे म्हणतात. जेवढी ती गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा करणार आपल्या मेंदूला वाटते ही गोष्ट आपल्यासाठी सगळ्यांत महत्वाची आहे. आणि तो त्याला जास्त महत्व देतो आणि उर्वरित पर्यायी मार्गांचा विचार कमी करतो.एकदा तुम्ही राग करा. तुम्हाला हलके छान वाटते. आपले काम झाले असे वाटते. आणि अशा वेळेस मेंदूला चुकीचा संदेश पोहोचतो की यार हा मार्ग तर भारी आहे. आणि अशाने आपल्याला नंतर क्षणात राग यायला लागतो. राग येण्याचा जणू सराव आपला होत जातो. आणि आता हाच राग फक्त ठराविक ठिकाणी न येता सगळीकडे यायला लागतो. ज्याला आपण "चिडचिड होणे" म्हणतो.तर राग येण्यासाठीचा मेन प्रोब्लेम हा आहे!! राग व्यक्त करण्याचे पर्यायी मार्ग असतात आणि चांगले पर्यायी मार्ग असतात परंतु आपण रागच करतो आणि गोष्टी बिघडतात. कारण मेंदूला तोच एक मार्ग माहित आहे आणि म्हणून मेंदू क्षणाचाही विलंब न करता सरळ तो अप्लाय करतो.मुळ प्रश्न : लहान सहान गोष्टींवर चिडणे थांबवण्यासाठी अंमलात आणाव्यात, अशा काही प्रत्यक्ष सवयी सांगाल का?"डोक्यात होणारी बैठक तोडा - ब्रेक द मिटिंग" (माझ्या अनुभवावरून हे नाव मीच दिलय. नक्कीच ह्याला काहीतरी शास्त्रीय नाव आणि आधार असेलच.)

जेव्हा पण आपल्या मनासारखे होत नाही तेव्हा डोक्यात तत्वांची, वाचलेल्या — पाहिलेल्या गोष्टींची, नीतीमूल्यांची एक बैठक सुरु होते. जसे संसदेत सगळे भांडण करतात, एकमेकांना शिवीगाळ करतात, बाकावर ठकठक करतात अगदी असाच गोंधळ डोक्यात त्यावेळेस सुरु होतो. आणि आपल्याला चांगलेच माहिती आहे. जेव्हा जेव्हा डोक्यात गोंधळ होत असेल तेव्हा आपली निर्णय घेण्याची क्षमता क्षीण होते आणि हातून चुका होतात.मी म्हणतो, "ही बैठक तोडा!!". जेव्हा राग आला सरळ ती जागा, ती व्यक्ती, तो वेळ सोडा चप्पल घाला आणि आणि बाहेर फिरून या. ह्यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल. बाहेर नाही जाऊ शकत तर गच्चीवर येऊन उभे राहा किंवा खिडकीतून बाहेर पहा. डोक्यात जे काही चालू आहे ते शांत होते जर तुम्ही तुमचे लक्ष दुसऱ्या ठिकाणी लावले तर!! मग अर्धा-पाऊण तासाने तुम्हाला घडल्लेया घटनेचा सारासार विचार करायला जमेल कारण तेव्हा गोंधळ शांत झालेला असेल. आता तुम्ही जे पण करणार ते बरोबर असण्याची शक्यता आहे."बॉक्स ब्रेथिंग" (नेवि सिल्सची एक लक्ष टिकवून ठेवण्याची प्रभावी पद्धत)जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपला मेंदू आपल्या ताब्यात न राहता Automatic Mode मध्ये जायला लागतो. जसे मी वर सांगितले की त्याला पर्यायी मार्ग दिसतच नाहीत ते हेच. अशा वेळेस डोक्यावर ताबा आणण्यासाठी आपले लक्ष श्वासावर आणा.बॉक्स ब्रेथिंग पद्धत अशी आहे...डोळे बंद करून ४ सेकंद मोजत मोजत नाकाद्वारे ४ श्वास आत घ्या.आत घेतला गेलेला श्वास ४ सेकंद पकडून ठेवा.आणि पुढचे ४ सेकंद श्वास सोडा. पहिल्यापासून रिपीट करा.असे ३-४ मिनिटे जरी केले तरी लक्ष लगेच "जे आहे त्यावर येते". ही पद्धत नेवी सिल्स असलेले सैनिक आपले लक्ष तात्काळ भानावर येण्यासाठी वापरतात. तुम्ही ह्या पद्धतीने कधीपण, कुठेपण आणि कशासाठी पण वापरू शकतात. जिथे लक्ष लावायचे आहे तिथे बॉक्स ब्रेथिंग करा.बॉक्स ब्रेथिंग केल्यामुळे तुमचा राग करण्याचा response time कमी होईल आणि राग क्षमेल.

नाहीतर असा राग करण्याचा टाईम एकदम लगेचच असतो. फट्टकरून!! बॉक्स ब्रेथिंगबद्दल अधिक येथे वाचा..."उलट मोजणी सुरु करा."राग आल्यावर १०० किंवा १५० पासून हळूहळू मनातल्या मनात उलट मोजणी म्हणायला सुरु करा. एकशे पन्नास, एकशे एकोणपन्नास, … , एकशे बावीस, एकशे एकवीस!! असं.उलट मोजणी करतांना गच्चीवर चालले जा किंवा दुसऱ्या रूममध्ये जा. एका ठिकाणी बसून घ्या आणि डोक्यात चाललेल्या क्रमांकांकडे लक्ष द्या. उलटच का म्हणायचे?? त्याचे कारण असे की १ ते १०० किंवा सुलटपद्धतीने सगळे आकडे आपले पाठ असतात. एक, दोन,तीन असे! परंतु जेव्हा आपण उलट पद्धतीने ह्यांना म्हणतो तेव्हा तो विचार करावा लागतो आणि हेच आपल्याला पाहिजे की आपले लक्ष दुसरीकडे लागले पाहिजे."लगेच तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची मदत घ्या"राग आला की सरळ युटूब उघडा आणि "चला हवा येऊ द्या!" चा एक लहान भाग पाहू शकतात. कानात इअरफोन लावून आवडीचे गाणे ऐकू शकतात. तुमच्या आवडीच्या चित्रपटाचा एखादा भारी सीन पाहू शकतात. जिथे पण तुमचे लक्ष लागते ते करा.फक्त दुसऱ्या व्यक्तीशी लगेच बोलू नका. नाहीतर तिकडून प्रतिसाद चांगला नाही मिळाला की अजून राग वाढेल. म्हणून ज्या लगेच पाहिजे तशा उपलब्ध होतील अशा गोष्टी करा. व्हिडीओ, गाणी, चित्रपट इत्यादी.जे म्हणतात ना मला राग येत नाही ते खरतरं कमी जास्त प्रमाणात खोट बोलतात असे माझे निरीक्षण आहे. प्रोब्लेम राग करण्यात नाही. प्रोब्लेम आहे राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देणे. जी हमखास चुकते. म्हणून स्वतःच लक्ष थोड्या वेळासाठी दुसऱ्या ठिकाणी लावा. ते शांत झाले की मग नेमकं काय झाल? आता काय केलं पाहिजे? हे केल्याने काय होईल? ते केल्याने काय होईल? असा विचार करा. आणि योग्य तो मार्ग काढावा."आपला कल नेहमी 'कोण चुकले' ह्याकडे असतो. स्वतःला 'काय चुकले' आहे ह्याकडे पाहायला शिकवा."परंतु मला असं वाटत की प्रतिक्रिया करायची पण काही गरज पडत नाही जेव्हा तुमचा राग क्षमतो.

 

सुनील इनामदार

English Summary: Irritated, so read on
Published on: 08 May 2022, 01:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)