News

ज्या योजनाच्या कामांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे  त्याचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा. अकोले व संगमनेर मधील सिंचन प्रकल्पांची साठवण क्षमता, प्रत्यक्ष होत असलेलला पाणी साठा याबाबतही अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा.

Updated on 11 June, 2025 12:44 PM IST

मुंबई : अकोले संगमनेर तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. या दोन्ही तालुक्यातील  सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी सिंचन प्रकल्प योजनांच्या कामांचे सर्वेक्षण करून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकोले मतदारसंघातील जलसंपदा विभागातील विकास कामे आणि संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील जलनियोजन संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार डॉकिरण लहामटेआमदार अमोल खताळजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरगोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवारमुख्य अभियंता  तथा सह सचिव संजीव टाटू आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखेपाटील म्हणालेआमदार डॉ. किरण लहामटे आणि आमदार अमोल खताळ यांनी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याबाबत ज्या योजनाप्रकल्पाची कामे सुचवली आहेत त्या योजना कामांचा जलसंपदा विभागाने अभ्यास करावा. ज्या योजनाच्या कामांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे  त्याचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा. अकोले संगमनेर मधील सिंचन प्रकल्पांची साठवण क्षमताप्रत्यक्ष होत असलेलला पाणी साठा याबाबतही अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा.

या बैठकीत आमदार डॉ. किरण लहामटे आणि आमदार अमोल खताळ  यांनी  उपस्थित केलेले  विविध मुद्दे कामांचा आढावा घेण्यात आला. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी या कामाचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कालबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीतअशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत मेळावणे बंधाराबिताका पाणी वळण बंधाराभंडारदराशिळवंडीबलठणपाडोशी  बुडित बंधारे बांधणेनिमगाव भोजापूर धरण पाण्याचे योग्य नियोजनसाकुर पठार भागातील पाणी प्रश्न आणि  निळवंडे डावा उजवा कालवा यासह अन्य विषयांचाही आढावा घेण्यात आला.

English Summary: Irrigation project work in Akole and Sangamner talukas should be accelerated Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil orders
Published on: 11 June 2025, 12:44 IST