पिकास पाणी किती व केव्हा द्यावे यावर प्रभाव टाकणारे अनेक घटक असतात त्यातील वेळ आणि स्थान या नुसार बदलत राहणाऱ्या जमीन, हवामान, पीक, सिंचन प्रणाली इ. घटकांशी निगडित आवश्यक त्या बाबी मिळविण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) हे तंत्रज्ञान उपयोगी पडते. ते राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विकसित केले आहे.
आपल्या पिकाला कधी आणि किती पाणी कोणत्या वेळी द्यायचे, याचे व्यवस्थापन करण्यासाठी हवामान आधारित ऑटो फुले इरिगेशन शेड्यूलर ही प्रणाली विकसित केली आहे. ज्या शेतामध्ये सिंचन द्यावयाचे आहे, तेथील प्रत्यक्ष वेळेप्रमाणे सिंचन प्रभावित करणारे हवामानाचे घटक. उदा. तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, पाऊस, वारा, इ. मोजण्यासाठी किंवा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पर्याय असू शकतात.
हवामान, जमीन पीक व पिकाच्या वाढीची अवस्था, सिंचन प्रणालीची वैशिष्ट्ये अशा सर्व बाबी गृहीत धरून त्या सिंचन प्रणालीद्वारे पिकास पाणी किती व केव्हा द्यावे हे निश्चित करणारे एखादे संगणकीय प्रारूप तयार केले जाते. गेल्या भागापासून आपण फुले इरिगेशन शेड्यूलर या विद्यापीठाने विकसित केलेल्या संगणकीय प्रारूपाची माहिती घेत आहोत. हे संगणकीय प्रारूप मोबाईलवर स्थापित करता येते.
कांद्याच्या अनुदानासाठी बनावट पावत्या, कारवाईची शेतकऱ्यांची मागणी...
ज्या पिकास सिंचन द्यावयाचे आहे, त्या पिकाची माहिती. ज्या जमिनीमध्ये पीक घेणार आहे, त्या जमिनीविषयीची माहिती. ज्या सिंचन प्रणालीद्वारे सिंचन दिले जात आहे, त्या प्रणालीची माहिती. ही माहिती त्या संगणकीय प्रारूपास उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांना सोपे व्हावे, म्हणून सोपा व सर्वांना वापरता येईल, असा इंटरफेस तयार केलेला आहे.
माजी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! आता शेतकरी मुलाशी लग्न केल्यास 2 लाख रुपये मिळणार...
वर नमूद केलेले सर्व घटक हे इंटरनेटद्वारे एकमेकास जोडलेले असतात. त्यामुळे या घटकांनी मोजलेल्या किंवा निश्चित केलेल्या माहितीची एकमेकांमध्ये देवाण घेवाण केली जाते. ही सर्व प्रक्रिया स्वयंचलितपणे घडते.
बोअरवेलमधील पाणी संपणे इ. या कारणामुळे पंप बंद झाला तर वीज किंवा पाणी (पंप बंद होण्याचे जे काही कारण असेल, ते) उपलब्ध झाल्यावर पंप आपोआप सुरू होतो. आधी नोंदवलेली वेळ किंवा निर्धारित वेळ पूर्ण करतो. ती पूर्ण झाल्यावर आपोआप बंद होतो.
राज्यात विकास सोसायट्यांचे जाळे वाढणार, २ लाख संस्था स्थापन करणार, केंद्राचा निर्णय..
राज्यात आज 'या' ठिकाणी गारपिटीचा होणार, हवामान खात्याचा इशारा..
भीमा पाटस कारखान्याप्रकरणी संजय राऊत यांची 26 एप्रिलला दौंडला होणार सभा, होणार मोठा गौप्यस्फोट
Published on: 14 April 2023, 11:41 IST