ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक आपले जीवन निर्वाह करण्यासाठी शेती करतात. तथापि, मातीची कमकुवत परिस्थिती, अनियमित पाऊस आणि गरीबी यामुळे त्यांना पारंपारिक शेतीच्या पद्धतींवर चिकटून राहण्यास भाग पाडले जाते. याचा परिणाम उत्पादनात होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीला बाधा येते. रासयानिक खतांचा अधिक वापर केल्यामुळेही जमिनीची सुपिकता कमी होत असते.पिकांच्या उत्पान्नासाठी मातीचे आरोग्य समजून घेणे आवश्यक असते. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.परंतु अनेक शेतकरी मातीचे परीक्षण करत नाहीत. तर काही शेतकरी मातीचे परीक्षण करतात पण बहुतेक वेळा बऱ्यापैकी निकाल लागतो आणि बऱ्याचवेळा चुकीच्या परिणामासह त्यांना समाधान मानावे लागते.
परंतु शेतकऱ्यांची ही समस्या आता दूर होणार आहे. कारण एका शेतकऱ्यांच्या मुलाने आपल्या स्टार्टअप सेन्सेग्रॅससह एक आयओटी सेन्सर विकसित केला आहे. जो मातीच्या आरोग्याचा डेटा संकलित करतो आणि पिकांचे उत्पादन सुधारण्यासाठी योग्य पाण्याचा आणि खताच्या वापराचा अंदाज लावण्यासाठी मदत करतो. हे मापण्यासाठी १८ मापदंड लावण्यात आली आहेत. आयओटी सेन्सर विकसित करणाऱ्या मुलाचे नाव हे ललित गौतम आहे. ललितने आपले शिक्षण परदेशात पूर्ण केले आहे. परदेशात शिक्षण करुनही त्याला भारतातील शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहे. संपादित केलेल्या ज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी ललित झटत आहे. शेतकऱ्यांकडून ललितला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद अधिक परिश्रम करण्यास प्रवृत्त करतो. या मॉडेलमुळे मी शेतकऱ्यांचे समाधानकारक उत्तर देऊ शकलो याचा मला आनंद असल्याचे ललित म्हणतो.
तंत्रज्ञान आणि शेतीमधील दरी कशी भरुन आणता येईल, हे आमचा आयओटी सेन्सर नॅनो-सॅटेलाइट टेकनॉलॉजीमुळे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. आम्ही नॅनो सॅटेलाइट फील्डच्या प्रतिमांद्वारे शेती कशी करण्यास साहाय्य होईल हे दाखविले. ललित हे नॅनो सॅटेलाइट वापरत आहेत, जे मातीच्या आरोग्याचे निरीक्षण करतात. आम्ही नानो उपग्रह फील्ड इमेजच्या माध्यमातून शेतीच्या शिफारशी अधिक अचूक प्रमाणात नोंद करत आहोत. ज्यामुळे पीक मॉडेलिंग तंत्राची रचना करण्यात आणि ठरविण्यात मदत होते. पीक आणि माती डेटा तसेच रिअल-टाइम फील्ड माहितीसाठी मोठ्या डेटाबेसवर एमएल वापरुन मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते असे ललितने पुढे नमुद केले.
Published on: 11 September 2020, 03:55 IST