News

ग्रामीण भागात राहून जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय जर चालू करायचा असेल तर तुम्ही शेतीच्या व्यवसायामध्ये तुमचे नशीब अजमावू शकता त्यास काय हरकत नाहीये. आजचे युग जर पाहिले तर बाजारामध्ये जास्तीत जास्त आरोग्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना ग्राहकांची मागणी आहे त्यासाठी तुम्ही पारंपरिक शेती बरोबर आरोग्याच्या दृष्टीने जे महत्वाचे पिके आहेत त्यांची मागणी मोठया प्रमाणात वाढलेली आहे. तुम्ही नगदी पिकाच्या शेतीमधून लाखो रुपयांची उलाढाल करू शकता.

Updated on 05 August, 2021 3:12 PM IST

लेमन ग्रास ची कल्पना तर तुम्हाला तर असेलच जे की अत्ताच्या काळानुसार लेमन ग्रास ची शेती करणे तुम्हाला खुप फायदेशीर ठरणार आहे. व्यवसाय करणार असाल तर चांगल्या प्रकारे तुम्हाला या व्यवसायातून फायदा मिळू शकतो.लेमन ग्रास या गवताची लागवड करायची असेल तर तुम्हाला फक्त २० हजार रुपये खर्च आहे परंतु या शेतीच्या माध्यमातून तुम्ही महिन्याला ४ लाख रुपये उत्पन्न घेऊ शकता.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही महिन्यांपूर्वी "मन की बात" या विषयाला धरून लेमन ग्रास शेती बद्धल संभाषण केले होते. लेमन ग्रास च्या शेती मधून शेतकऱ्यांना तसेच  व्यवसाय  करणाऱ्या  इच्छुकांना  यामधून चांगले उत्पन्न मिळू शकते असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

हेही वाचा:ब्रम्हपुरीचा "उकड्याला" परदेशातून मागणी, रोज ५०० टन तांदूळ विदेशात

लेमन ग्रास जर शेती केली तर त्या लेमन ग्रास च्या माध्यमातून कॉस्मेटिक, साबण, तेल तशीच वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक  औषधे  तयार होतात  आणि सध्या बाजारात अशा गोष्टीना मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे लेमन ग्रास ला मोठ्या प्रमाणात महत्व दिले गेले आहे.यामध्ये  सर्वात  विशेष बाब  म्हणजे दुष्काळ ग्रस्त भागामध्ये सुद्धा लेमन ग्रास ची शेती करू शकता. तुम्ही जर व्यवसायाच्या दृष्टीने एका एकरात जर लेमन ग्रास ची  शेती केली  तर  महिन्याला तुम्हाला सर्व साधारणपणे ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

जनावरांकडून नुकसान होण्याचा धोका नाही:-

पारंपारिक पद्धतीने जी केलेली शेती असते त्या शेतीला खताची गरज लागते परंतु लेमन ग्रास च्या शेतीला कोणत्याही खताची गरज लागत नसते तसेच गुरे किंवा जंगली प्रकारची जी जनावरे असतात त्यांच्यापासून या शेतीला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. तुम्ही जर एकदा पेरणी केली की त्या नंतर सहा ते सात वर्षे लेमन ग्रास चे पीक येतच राहते जे की एकदा पेरणी केली की सहा ते सात वेळा लेमन  ग्रास ची कापणी केली जाते. लेमन  ग्रास पासून  तेल सुद्धा  निघते त्यापासून बाजारपेठेत लेमन ग्रास ला मोठी मागणी आहे.

English Summary: Invest Rs 20,000 in Lemon Grass Farming, Profit of Millions of Rupees per Month
Published on: 05 August 2021, 03:11 IST