News

ज्या व्यक्तींना व्यवसाय सुरू करून बंपर कमाई करायची असेल तर डेअरी प्रोडक्ट अमूल सोबत बिझनेस करण्याची संधी आहे. अमूल फ्रेंचाइजी ऑफर करीत आहे. छोटे गुंतवणूकदार त्यातून बंपर कमाई करू शकतात. यासाठी तुम्हाला अमूलची फ्रेंचाइजी घ्यावी लागेल.

Updated on 22 August, 2021 9:06 PM IST

ज्या व्यक्तींना व्यवसाय सुरू करून बंपर कमाई करायची असेल तर डेअरी प्रोडक्ट अमूल सोबत बिझनेस करण्याची संधी आहे. अमूल फ्रेंचाइजी ऑफर करीत आहे. छोटे गुंतवणूकदार त्यातून बंपर कमाई करू शकतात. यासाठी तुम्हाला अमूलची फ्रेंचाइजी घ्यावी लागेल.

विना रॉयल्टी आणि प्रॉफिट शेअरिंगने मिळणार 

अमूल रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगची फ्रेंचाइजी ऑफर करीत आहे. एवढेच नाही तर यासाठी लागणारा खर्च सुद्धा खूप नाही. तुम्ही 2 लाखापासून ते 6 लाखापर्यंत खर्च करून आपला व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात सुरूवातीपासूनच चांगला प्रॉफिट मिळतो.

हेही वाचा : कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारे पाच बिझनेस आयडिया

कंपनीची फ्रेंचाइजी घेण्याच्या अटी

जर तुम्ही अमूल आऊटलेट घेत असाल तर तुमच्याकडे 150 स्केअरफूट जागा असावी जर इतकी जागा असेल तर अमूल तुम्हाला फ्रेंचाइजी देईल. तसेच आइसक्रीम पार्लर साठी कमीत कमी 300 स्केअरफूट जागा असायला हवी. यापेक्षा कमी जागेत. फ्रेंचाइजी ऑफर नाही करता येत.

 

किती गुंतवणूक करावी लागेल

AMUL दोन प्रकारच्या फ्रेंचाइजी ऑफर करीत आहे. जर तुम्हाला अमूल आऊटलेट अमूल रेलवे पार्लर किंवा क्योस्कची फ्रेंचाइजी घ्यायची असेल तर, साधारण 2 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रॅंड सिक्योरिटीच्या अंतर्गत 25 हजार रुपये तसेच रिनोवेशनला 1 लाख रुपये इक्विपमेंटवर 75 हजार रुपये खर्च येतो. याची अधिक माहिती तुम्हाला फ्रेंचाइजीच्या पेजवर मिळेल.

दुसरी फ्रेंचाइजीसाठी 6 लाखाची गुंतवणूक

जर तुम्ही अमूल आइसक्रीम स्कूपिंग पार्लर चालवू इच्छिता तर त्या फ्रेंचाइजीसाठी 5-6 लाख रुपये गुंतवणूक आवश्यक असेल. यामध्ये ब्रॅंड सिक्योरिटीसाठी 50 हजार रुपये, रिनोवेशनसाठी 4 लाख रुपये, इक्विपमेंटसाठी 1.50 लाख रुपयांची आवश्यकता असते.

किती करु शकणार कमाई

अमूलच्या मते फ्रेंचाइजीच्या माध्यमातून दर महिन्याला साधारण 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. यामध्ये मिल्क पाऊच 2.5 टक्के, मिल्क प्रोडक्टवर 10 टक्के आणि आइसक्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते.

अमूल आइसक्रीम पार्लरची कमाई

अमूल आइसक्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचाइजी घेतल्यानंतर रेसिपी बेस्ड आइसक्रीम, शेक, पिज्जा, सॅंडविच, हॉट चॉकलेट, ड्रिंकवर 50 टक्के कमीशन मिळते. तसेच प्री-पॅक आइसक्रीमवर 20 टक्के आणि अमूल प्रोडक्टवर कंपनी 10 टक्के कमीशन देते.

 

अमूल देणार सपोर्ट

अमूलकडून तुम्हाला LED सायनेज दिले जातील. सर्व इक्विपमेंट आणि ब्रॅंडिंगवर सब्सिडी मिळवून दिली जाईल. इनोग्रेशन सपोर्ट दिला जाईल आणि जास्त निगोशिएट केल्यास डिस्कॉंउंट देखील मिळेल ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर दिले जातील. पार्लर बॉय किंवा मालकाला ट्रेनिंग दिली जाईल. तुमच्यापर्यंत प्रोडक्ट पोहचवण्याची जबाबदारी अमूलची असेल.

कसा करणार अर्ज

जर तुम्ही फ्रेंचाइजीसाठी अप्लाय करू इच्छित असाल तर retail@amul.coop वर मेल करणे गरजेचे असेल. तसेच पूर्ण प्रोसेस जाणून घेण्यासाठी  या लिंक वर क्लिक करा.

http://amul.com/m/amul-scooping-parlours

English Summary: Invest Rs 2 Lakh Business With AMUL, Earn Rs 10 Lakh Every Month, Learn Details
Published on: 22 August 2021, 09:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)