कोरोना व्हायरसने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. यामुळे अनेक देशातील अर्थिकव्यवस्था डबघाईला आली आहे. अनेकांचा रोजगार गेला आहे, बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहे. यामुळे अनेकजण आता व्यवसायाकडे वळत आहेत. विशेष व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारही मदत करत आहे. कमी पैशाच्या गुंतवणुकीत अधिकचा नफा मिळवून देणारे अनेक व्यवसाय आहेत. यात एक व्यवसाय तो म्हणजे डेअरी वस्तू बनवण्याचा. (Dairy Products). यात नुकसान होण्याची शक्यता मात्र कमीच आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ५ लाखांची गुंतवणूक केल्यानंतर आपल्या मनात लगेच प्रश्न आला असेल तो म्हणजे नफा किती येणार. काळीजी करू नका या गुंतवणुकीतून तुम्हाला नक्कीच मोठा नफा मिळणार आहे, दरमहा तुम्ही ७० हजार रुपयाची कमाई कराल यात शंका नाही. जर आपल्याला हा व्यवसाय करायचा असेल तर याची पूर्ण प्लानिंग करावी.
भांडवल उभारा - व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलची गरज असते. या व्यवसायासाठी ५ लाख रुपयांची गुंतवणूक आपल्याला करावी लागणार आहे. परंतु मोदी सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेतून आपण कर्ज मिळवून याचे भांडवल उभारू शकता. कोणत्याही व्यवसायासाठी सरकार मदत करत असते. परंतु आपल्याला आपल्या प्रोजेक्टविषयी योग्य माहिती द्यावी लागते. आपण कशा पद्धतीने व्यवसाय सुरू करणार आहोत, किंवा आपल्या व्यवसायाची क्षमता काय ही सर्व माहिती आपल्याला द्यावी लागते. जर आपण मुद्रा लोन योजनेतून पैसे घेतले तर बँक आपल्याला ७० टक्के पैसे देईल. या व्यवसायाचे बजेट आपण आखल्यास साधरण १६ लाख ५० हजार रुपयापर्यंतचे प्लांट आपण टाकू शकतो. उद्योग कर्त्याला ५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रोजेक्ट नुसार आपण पाहिले तर या व्यवसायात एक वर्षात ७५ हजार लिटर प्लेवर्ड मिल्कचा व्यवहार होऊ शकतो. यासह ३६ हजार लिटर दही, ९० हजार लिटर बटर, आणि ४५०० किलोग्रॅम तुप बनवून आपण ते विकू शकतो. यानुसार, ८२ लाख ५० हजार रुपयांचे टर्नओवर होते. म्हणजे वर्षाला आपण ८२ लाख रुपयांची कमाई करू शकतो. यात ७४ लाख रुपयांच खर्च आणि १४ लाख रुपये हे व्याजाचे जातील. त्यानंतर साधरण ८ लाख रुपये आपल्याकडे शिल्लक राहतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला १ हजार स्वेअर फूट जागा हवी. १५० स्क्वेअर मध्ये रेफ्रिजरेशन रूम, ५०० स्क्वेअर फूटात प्रॉसेसिंग एरिया, १५० स्क्वेअर फुटात वॉशिंग एरिया, १०० स्क्वेअर फुटात ऑफिस, टॉयलेट आणि दुसरी सुविधेसाठी उपयोगी पडेल.
Published on: 17 June 2020, 01:28 IST