आपण आज एलआयसीच्या (LIC) एका खास योजनेविषयी जाणून घेणार आहोत. ज्याचा सर्वसामान्य लोकांना चांगला फायदा होईल. या योजनेत कमी पैशांची गुंतवणूक करून तुम्ही चांगला लाभ घेऊ शकता.
या योजनेचं नाव 'एलआयसी आम आदमी विमा योजना' आहे. ही एलआयसीची विमा संरक्षण योजना (Insurance coverage plan) आहे. विशेषत: असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
देशातील असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना आर्थिक स्तरावर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. याशिवाय हंगामी बेरोजगारीमुळंही त्यांना खूप त्रास होतो. या सर्व लोकांना जीवन जगताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशा परिस्थितीत LIC ची ही योजना असंघटित क्षेत्र आणि गरीब भूमिहीन कुटुंबांना विमा संरक्षण देण्याचं काम करते.
खरीप हंगामातील पिकांवर किडींचा प्रादुर्भाव; वेळीच करा कीड व्यवस्थापन, अन्यथा होईल मोठे नुकसान
योजनेबद्दल सविस्तर माहिती
एलआयसीच्या या प्लॅनमध्ये तुम्ही 100 रुपयांचा प्रीमियम (Premium) भरून 75,000 रुपयांचं विमा संरक्षण घेऊ शकता. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना विमा संरक्षणाशिवाय इतर अनेक सुविधा मिळतात.
या योजनेंतर्गत सरकार (government) तुमच्या 50 टक्के रक्कम भरतं. म्हणजेच, योजनेतील प्रीमियमची एकूण रक्कम 200 रुपये असेल, तर यामध्ये विमाधारकाकडून 100 रुपये घेतले जातात. त्याच वेळी सरकार उर्वरित 100 रुपये प्रीमियम भरतं.
विनायक मेटेंच्या अपघाताबाबत खळबळजनक माहिती आली समोर! अपघाताआधी 3 ऑगस्टला...
या योजनेअंतर्गत, जर विमाधारकाचा नैसर्गिक मृत्यू (natural death) झाला असेल. तर अशा परिस्थितीत नॉमिनीला 30,000 रुपये दिले जातात. जर पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत नॉमिनीला 75 हजार रुपये दिले जातात.
जर विमाधारक पूर्णपणे कायमचा अपंग झाला. तर अशा परिस्थितीत, त्यानं ठरवलेल्या नॉमिनीला 75 हजार रुपये दिले जातात. मात्र, या योजनेत अपंगत्वाचे अनेक निकष निश्चित करण्यात आले आहेत. जर विमाधारक एका डोळ्यानं किंवा एका बोटानं अक्षम असेल. अशा स्थितीत त्याला 37 हजार रुपये दिले जातात.
महत्वाच्या बातम्या
Ration Card: आता 'या' योजनेअंतर्गत रेशन कार्ड सहज होणार उपलब्ध; जाणून घ्या प्रक्रिया
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारने दिली 'ही' मोठी सवलत; जाणून घ्या
Electric Scooters: Hero एलेक्ट्रिक स्कूटर फक्त 10 हजार रुपयात घरी घेऊन या; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये
Published on: 16 August 2022, 04:26 IST