News

जागतिक मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. आज झपाट्याने बदलत असलेल्या युगात अनेक जुन्या भाषा नष्ट होत आहेत. त्यामुळेच समाजात भाषेतील आणि संस्कृतीमधील विविधता जपण्यासाठी प्रयत्न केले हात आहेत.

Updated on 21 February, 2022 11:57 AM IST

World Mother Language Day : जागतिक मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. आज झपाट्याने बदलत असलेल्या युगात अनेक जुन्या भाषा नष्ट होत आहेत. त्यामुळेच समाजात भाषेतील आणि संस्कृतीमधील विविधता जपण्यासाठी प्रयत्न केले हात आहेत. जगभरातील भाषा आणि सांस्कृतिक विविधता जोपासणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश्य आहे. सर्व मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" जाहीर केला.

मातृभाषा म्हणजे काय?

मातृभाषा म्हणजे, अशी भाषा जी मुलं सर्वप्रथम आपल्या घरात बोलतो ही भाषा. मुलाला त्याची पहिली गुरु म्हणजे त्याची आई त्याला ती भाषा शिकवते. भाषा विचारांची देवाण-घेवाण करण्याचा एक माध्यम आहे. मग ती भाषा कुठलीही असो. जगात सुमारे ७ हजार भाषा बोलल्या जातात. भारतातही प्रामुख्याने २२ भाषा बोलल्या जातात. भारतात जवळपास 1300 च्या आसपास मातृभाषा आहेत.

जागतिक मातृभाषा दिनाचा इतिहास

भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते. पश्चिम बांगलादेशमध्ये उर्दू आणि पश्चिम बांगलादेशमध्ये बंगाली भाषिकांचे प्रमाण अधिक होते. तत्कालीन पाकिस्तान सरकारने भाषा धोरण लागू करून पाकिस्तानची अधिकृत भाषा म्हणून उर्दूला मान्यता दिली होती.

जगाच्या इतिहासात भाषेसाठी छेडण्यात आलेली ही विशेष मोहिम लक्षात घेता संयुक्त राष्ट्राने स्थानिक भाषा आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 21 फेब्रुवारी दिवशी जागतिक स्तरावर मातृभाषा दिवस साजरा करण्याचे ठरवले.

भारत सरकार कडून जागतिक मातृभाषा दिनाचं औचित्य साधत खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. भारतात अनेक धर्म आणि जातीचे लोक राहतात. प्रत्येकाची भाषा वेग-वेगळी आहे. भारतात बहुभाषिक लोक राहतात. आपल्या भाषेत बोलली जाणारी भाषा त्या भाषेची मायबोली म्हटली जाते.

हे ही वाचा : पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांसाठीच ठरली फायद्याची; धक्कादायक माहिती आली समोर

जिल्ह्यात 11 साखर कारखाने सुरु असताना शेतकऱ्यांचा ऊस फडातच; वजनात मोठी घट

मुलांच्या मानसिक, बौद्धिक विकासासाठी प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेमध्ये (Mother Tongue) होणं गरजेचे आहे. यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजन केले आहे.

English Summary: International Mother Language Day
Published on: 21 February 2022, 11:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)