Budget 2024 : मोदी सरकारकडून आज (दि.१) रोजी देशाचे अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. तसंच राष्ट्रपतींनी केंद्रीय अर्थमंत्र्यांचे तोंड देखील गोड केलं आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यंदा सहाव्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
ज्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असतात. तेव्हा त्याआधी जो अर्थसंकल्प सादर केला जातो त्याला अंतरिम अर्थसंकल्प असे म्हटले जाते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत पोहचल्या आहेत. त्यामुळे काही वेळातच संसदेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सध्या पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. सुमारे एक तासानंतर म्हणजे सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्पीय भाषण देतील.
Published on: 01 February 2024, 10:57 IST