Budget 2024 News : मोदी सरकारकडून आज (दि.१) रोजी देशाचे अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. १० वर्षात देशाचा जास्त विकास केला आहे. सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र आहे, असं अर्थमंत्री भाषणादरम्यान म्हटल्या आहेत.
यावेळी अर्थमंत्री सीतारामन म्हटल्या की, आवास योजना, हर घर जल योजना, वित्त सेवा रेकॉर्ड अशा अनेक विविध योजना सरकारने राबवल्या आहेत. तसंच २५ कोटींपेक्षा जास्त लोकांना योजनाचा लाभ दिला आहे.
दरम्यान, प्रधानमंत्री फसल विमा योजनाचा अनेक शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. या योजनेतंर्गत आर्थिक लाभ दिला जातोत. तसंच हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करतंय असंही अर्थमंत्री सीतारामन भाषना दरम्यान म्हटल्या आहेत. तसंच पीएम किसान योजनेचा ११ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. तसंच ३ लाख कोटींचा व्यापार शेती क्षेत्रातून होतोय,असंही अर्थमंत्री म्हणाल्या.
Published on: 01 February 2024, 11:26 IST