News

बुलडाणा : सद्या परिस्थितीत कपाशी पिक रोप अवस्थेत आहे. सुरवातीच्या काळात कपाशी पिकावर प्रामुख्याने मावा आणी तुडतुडे ह्या रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा ह्या किडींचा प्रादुर्भाव जुलैच्या दुस-या आठवड्यापासून आढळून येतो, तर तुरतुड्यांचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून आढळून येतो.

Updated on 24 July, 2021 7:42 AM IST

बुलडाणा : सद्या परिस्थितीत कपाशी पिक रोप अवस्थेत आहे. सुरवातीच्या काळात कपाशी पिकावर प्रामुख्याने मावा आणी तुडतुडे ह्या रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा ह्या किडींचा प्रादुर्भाव जुलैच्या दुस-या आठवड्यापासून आढळून येतो, तर तुरतुड्यांचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून आढळून येतो.

मावा ही किड रंगाने पिवळसर किंवा फिक्कट हिरवी असून आकाराने अंडाकृती गोल असते. मावा पानाच्या खालच्या बाजुने आणि कोवळ्या शेंड्यावर समुहाने राहून त्यातील रस शोषण करतो. प्रादुर्भाव ग्रस्त पाने प्रथम निस्तेज होवून नंतर कोकडतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते या शिवाय मावा आपल्या शरीरातुन गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे झाडे चिकट व काळसर होतात.

तुडतुडे फिक्कट हिरव्या रंगाचे असून पाचरीच्या आकाराचे असतात. तुडतुड्याच्या पिलांना पंख नसतात आणि ते नेहमी लांबीला तिरके चालतात. तुडतुडे नेहमी पानाच्या खालच्या बाजुला राहून त्यातील रस शोषण करतात, अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होवून नंतर तपकीरी रंगाचे झाढाची वाढ खुंटते आणि अशा झाडांना पात्या, फुले आणि बोंडे कमी प्रमाणात लागतात. या किडींचा प्रादुर्भाव बाबत सर्वेक्षण करावे. सरासरी संख्या 10 मावा/पान किंवा 2 ते 3 तुडतुडे/ पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.

 

एकात्मीक व्यवस्थापन :

वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने, इतर पाला पाचोळा जमा करून किडींसहीत नष्ट करावा, वेळेवर आंतर मशागत करून पीक तण विरहीत ठेवावे त्यामुळे किडींच्या पर्यायी खाद्य तणाचा नाश होईल. तसेच बांधावरील किडीच्या पर्यायी खाद्य तणे तसे अंबाडी, रानभेंडी इ. नष्ट करावी. मृद परिक्षणाच्या आधारावर खत मात्रेचा अवलंब करून दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर योग्य तेच ठेवावे आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा. जेणे करून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही. पिक दाटणार नाही. पर्यायाने अशा पिकावर किडही कमी प्रमाणात राहील, बिटी कपाशीच्या बियाण्याला ईमीडाक्लोप्रीड किंवा थायोमेझो्क्साम किटकनाशकांची बिज प्रक्रीया केलेली असते. त्यामुळे रस शोषक या किडीपासून सर्वसाधारण 2 ते 3 आठवड्यापर्यंत संरक्षण मिळते. म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये.

रसशोषक किडींवर उपजिवीका करणारे नैसर्गीक किटक उदा. सीरफीड माशी, कातीन, ढालकीडे, क्रायसोपा, ॲनॅसयीस, प्रजातीचा परोपजीवी किटक ई. संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास रसशोसक किडींच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा ॲझारीडेक्टीन 0.03 टक्के निंबोळी तेल आधारीत डब्लु.एस.पी.30 मिली किंवा ॲझारीक्टीन 5 टक्के (डब्लू/डब्लू एन.एस.के.ई.) 20 मिली. सर्व उपाययोजनांचा अवलंब करूनही किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे आढळून आल्यास कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकांचा 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने त्यांचा वापर करावा. बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 20 मिली, डॉयफेंथ्युरॉन 50 टक्के पा. मि. भुकटी 12 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करून कपाशी पिकाची संरक्षण करावे असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी बुलडाणा यांनी केले आहे.

प्रतिनिधी गोपाल उगले.

English Summary: Integrate management of aphids and weevils on Bt cotton crop - Agriculture Officer
Published on: 24 July 2021, 07:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)