News

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा वाद पेटला आहे. यामुळे सध्या युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाने आपले सैनिक युक्रेनमध्ये पाठवले आहेत. आता अनेकांचे जीव यामध्ये जात आहेत. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.

Updated on 25 February, 2022 11:20 AM IST

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा वाद पेटला आहे. यामुळे सध्या युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाने आपले सैनिक युक्रेनमध्ये पाठवले आहेत. आता अनेकांचे जीव यामध्ये जात आहेत. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. असे असताना आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दोन दिवसाच्या रशियाच्या दौऱ्यावर मॉस्कोमध्ये दाखल झाले आहेत. मात्र यावेळी इम्रान खान यांचा मोठा अपमान झाला. यामुळे आता याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी कोणताही मोठा रशियन अधिकारी तिथे उपस्थित नव्हता. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

अनेक दिवसांमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रशियाचा दौरा केला नव्हता. अनेक वर्षांपासून आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा रशियाचा दौरा होता. पण त्यांचे स्वागत करायला कोणताच मोठा अधिकारी उपस्थित राहिला नाही. जो अधिकारी उपस्थित होता, त्याने इम्रान खान यांचे स्वागत तर केले पण, आपण आता उद्या भेटू असे सांगून ते देखील निघून गेले. यामुळे इम्रान खान यांच्या दौऱ्यावर जगभरातून प्रतिक्रिया येत असून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी यावरुन त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.

दरम्यान, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध जगभरातून केला जात आहे. इम्रान खान यांच्यात थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 1970 च्या चीन भेटीदरम्यान चीनने व्हिएतनामवर हल्ला केला होता त्यावेळी जे केलं तेच करतील. इम्रान खान यांनी आपला दौरा त्वरित रद्द करावा आणि मायदेशी परतावं. अन्यथा ते देखील या हल्ल्याचे भागिदार असतील, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. यामुळे आता ते काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेने यावर म्हटले आहे की, जगातल्या प्रत्येक जबाबदार देशाने रशियाच्या आक्रमणाविरोधात आवाज उठवावा, ही त्यांची जबाबदारी आहे. तर दुसरीकडे इम्रान खान यांनी म्हटलं की, रशियाला भेट दिलेली वेळ ही एकदम परफेक्ट आहे. यावर अमेरिकेने पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. एक जबाबदार राष्ट्रप्रमुख म्हणून वागा, असे अमेरिकेनं इम्रान खान यांना म्हटलं आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष आणि इतर देशानी रशियावर लादलेले निर्बंध पाहता इम्रान खान यांचा रशिया दौरा पाकिस्तानसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. या दौऱ्यावर अमेरिकेने कठोर शब्दात टीका केली आहे.

English Summary: insult Imran Khan Russia support war, find out exactly what happened ..
Published on: 25 February 2022, 11:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)