News

मुंबई: अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक झाली. श्री. पटोले म्हणाले, नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जाते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा तसेच त्यांना वेळेवर पैसे देण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी. राज्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. उर्वरित खरेदी केंद्रेही त्वरीत सुरु करावी, अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्रासाठी नोडल एजन्सी व सबएजंट संस्थेने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

Updated on 15 February, 2020 12:33 PM IST


मुंबई: 
अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक झाली. श्री. पटोले म्हणाले, नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जाते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा तसेच त्यांना वेळेवर पैसे देण्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी.

राज्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. उर्वरित खरेदी केंद्रेही त्वरीत सुरु करावी, अमरावती जिल्ह्यात शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्रासाठी नोडल एजन्सी व सबएजंट संस्थेने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. राज्यातील ‘नाफेड’ची बैठक लवकरच घेण्यात येईल. हरभरा खरेदीबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून राज्यात लवकरच त्याची खरेदी सुरु होईल, असेही श्री.पटोले यांनी सांगितले.

यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशनचे मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, नाफेड मुंबई ब्रँच मॅनेजर पुनीत सिंग, मार्केटींग फेडरेशनचे नागपूरचे संजय निचल, पणन विभागाचे अवर सचिव श्रीमती सुनंदा घड्याळे आदी उपस्थित होते.

English Summary: Instructions to start pigeon pea and chick pea procurement Center in Amravati District
Published on: 15 February 2020, 12:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)