News

मुंबई: विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान हे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात यावे. धान खरेदीनंतर तात्काळ त्याचा परतावा मिळावा यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना असून, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

Updated on 02 January, 2020 3:16 PM IST


मुंबई:
विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान हे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात यावे. धान खरेदीनंतर तात्काळ त्याचा परतावा मिळावा यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना असून, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. विधानभवनात शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विक्रेंद्रित खरेदी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. पटोले बोलत होते.

श्री. पटोले म्हणाले, शासनाच्या योजना या शेतकऱ्यांसाठी असून, त्यांना न्याय मिळावा या पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी. किमान आधारभूत किंमत केंद्रावरील शेतकऱ्यांचे धान पावसाने खराब होऊ नये यासाठी जलद गतीने खरेदी करावे. धान खरेदीनंतर सात दिवसामध्ये शेतकऱ्यांना त्याचा परतावा देण्यात यावा. उपलब्ध ॲपमध्ये सुधारणा करून, शेतकऱ्यांना यासंदर्भात सूचना देण्यात यावी. भविष्यात धान साठून राहू नये आणि शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो परतावा मिळावा आणि धान खराब होऊ नये, यासाठी वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी आणि संबंधित संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा आणावी, असेही श्री. पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

यावेळी बैठकीत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, पणन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

English Summary: Instructions on using the technology for immediate refund of paddy procurement
Published on: 02 January 2020, 02:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)