News

मुंबई: राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि ज्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागात पुढील पाच वर्षात हे प्रकल्प मिशन मोडमध्ये वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.

Updated on 13 June, 2019 10:21 AM IST


मुंबई:
राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि ज्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागात पुढील पाच वर्षात हे प्रकल्प मिशन मोडमध्ये वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.

वर्षा निवासस्थानी दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-दमणगंगा नदीजोड प्रकल्पासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन,राज्यमंत्री विजय शिवतारे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरना, पार-गोदावरी-दमणगंगा-वैतरणा-गोदावरी- दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून राबविण्याऐवजी राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या माध्यमातून ज्या भागामध्ये पाणीसाठा उपलब्ध होईल. त्या भागात पाणीपुरवठ्याचा समतोल राखण्याची दक्षता घ्यावी आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागात पाणीपुरवठा कसा करता येईल याचे योग्य नियोजन करावे.

वरील नदीजोड प्रकल्प तीन महामंडळात विभागले आहेत. या प्रकल्पाच्या एकत्रित व एकसूत्री अंमलबजावणीसाठी थेट शासनांतर्गत स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय (मुख्य अभियंता नदीजोड विशिष्ट प्रकल्प) स्थापन करावे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काही अडचणी असल्यास त्यातून समन्वयाने योग्य तो मार्ग काढून लोककल्याणकारी प्रकल्प म्हणून कालमर्यादेत पूर्ण करावेत. त्यामुळे मराठवाडा आणि ज्या भागात दुष्काळ आहे, त्या भागात पाणीसाठा उपलब्ध होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

English Summary: Instructions for completion of river interlinking project on mission mode in the state
Published on: 13 June 2019, 10:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)