राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बरेच राजकीय नेते शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. अतिवृष्टीमुळे गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मंगळवारी केंद्रीय पथकांनी दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पाहणी केली.
या पथकातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील चार तालुक्यांतील दहा गावांत जाऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त भागांची, तसेच शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच केंद्रीय पथकांनी हेलिकॉप्टर मधून जाऊन गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील शेतीची पाहणी केली व तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या पथकात अर्थमंत्रालयाचे उपसचिव रूपकदास तालुकदार, कृषी विभागाचे संचालक ए. एल. वाघमारे,रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर यांचा समावेश होता. अतिवृष्टीमुळे या भागातील नागरिकांना स्थलांतर करावे लागले होते. तसेच या भागातील घरे,रस्ते,शेती यांचे अतोनात नुकसान झाले होते.
याची पाहणी करण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील आरडा, मुगापूर व मृदुकृष्णापूर या गावांना केंद्रीय पथकांनी भेट दिली विशेष म्हणजे देवळी तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी प्रशांत निमसडकर यांनी सुरुवातीला इंग्रजी नंतर हिंदी व त्यानंतर मराठी भाषेत केंद्रीय पथकातील बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी तेथील अतिवृष्टीमुळे ओढावलेली पूरस्थिती व नुकसानीची माहिती त्यांना दिली.
नका घेऊ टेंशन!कांद्यावर 'ही' प्रक्रिया केली ना तर कमवाल बक्कळ नफा,वाचा सविस्तर माहिती
पिकांसोबत जनावरांचेही नुकसान
जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या सिरोंचा तालुक्यातील नुकसानीची माहिती पथकातील सदस्यांना माहिती दिली. यावेळी
पथकातील सदस्यांनी गावातील उपस्थित शेतकरी व नागरिक यांच्याशी संवाद साधला. तेथे उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांना शेतीसह झालेल्या जनावरांच्या हानीबाबत माहिती दिली. केंद्रीय पथकाने, लवकरात लवकर नुकसानीचा अहवाल केंद्राकडे सादर करून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली.
महत्वाच्या बातम्या:
केंद्राकडून मोठी सूचना! मंकीपॉक्सचा धोका वाढल्याने घेतला निर्णय..
#HarGharTiranga: पीएम मोदींच्या मोहिमेत कृषी जागरणचा समावेश, तिरंगा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा
Published on: 03 August 2022, 05:21 IST