News

महाॲग्रीटेक प्रकल्प अंमलबजावणी संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मायक्रो नेट सोल्युशनचे धीरज मेहेरा, कृषी विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

Updated on 05 May, 2025 11:14 AM IST

मुंबई : पीक घेताना कोणत्या पिकाची पेरणी केली तर फायदा होऊ शकतो. आपल्या क्षेत्रात कोणत्या पेरणी केलेली आहे याची माहिती शेतकऱ्यांना होण्यासंदर्भातील तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे असून महाॲग्रीटेक प्रकल्प अंमलबजावणीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश होणे गरजेचे आहे, असे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

महाॲग्रीटेक प्रकल्प अंमलबजावणी संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीमायक्रो नेट सोल्युशनचे धीरज मेहेरा, कृषी विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले कीपीक उत्पादन उत्पन्न अंदाज, उपग्रह आधारित पीक क्षेत्र, उत्पन्नाचे अंदाज नियोजन  करणेउपग्रह प्रतिमा वापरून पीक साठ्याचे मॅपिंग करणेपीक नुकसानहानीचे मूल्यांकनपिकाच्या वाढीचा कालावधी टिपणेपेरलेली पिकेपर्यायी पीकयोग्यता विश्लेषण या बाबींसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी विविध संस्थाकडून त्यांच्या यंत्रणांची काम करण्याची क्षमता पाहून धोरणात्मक निर्णय घेवून अद्यावत प्रणाली विकसित करण्यात येईल असेही कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

English Summary: Innovative technology should be included in the implementation of the Maha Agritech project Agriculture Minister Adv. Manikrao Kokate
Published on: 05 May 2025, 11:14 IST