News

देशात सर्वत्र शेती करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. दिवसेंदिवस शेतीमध्ये उत्पादन खर्च वाढत आहे. निसर्गाचा लहरीपणा तसेच बाजारपेठेत शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर यामुळे बळीराजा भरडला जात आहे.

Updated on 02 April, 2022 3:27 PM IST

देशात सर्वत्र शेती करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. दिवसेंदिवस शेतीमध्ये उत्पादन खर्च वाढत आहे. निसर्गाचा लहरीपणा तसेच बाजारपेठेत शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर यामुळे बळीराजा भरडला जात आहे.

खानदेशात देखील शेतकरी राजा अनेक अडचणींचा सामना करत आहे. यात प्रामुख्याने मजूरटंचाईचा समावेश होतो. मजूर टंचाईमुळे दिवसेंदिवस शेतमजुरांची रोजंदारी वाढत आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी बांधव भरडला जात असून शेती करायची कशी असा सवाल आता उपस्थित करीत आहे.

खानदेशातील शेतकरी बांधव आता मजूरविना शेती करण्याच्या वाटा शोधू लागला आहे. शेतकरी बांधव आता कमी खर्चात शेतीतून उत्पन्न मिळविण्याच्या दिशेकडे वाटचाल करत आहे. खान्देशात शेतकरी बांधव आता सुबाभूळ शेतीकडे वळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

सुबाभूळ शेती ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या शेतीसाठी मजूर लागत नाही यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होते शिवाय उत्पन्न देखील लाखांच्या घरात मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. यामुळे आगामी काळात खानदेश मध्ये सुबाभूळ शेतीचे क्षेत्र वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

या अनुषंगाने खानदेश मधील शेतकरी गुजरात मधील कागद निर्माण करणाऱ्या कंपन्यांना भेटी देत आहेत. कंपन्यांकडून शेतकरी बांधव सुबाभूळ शेतीचे तंत्र समजून घेत आहेत. सुबाभूळ शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते तसेच यातून अल्प कालावधीतच उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी बांधव आता याच्या लागवडीकडे सरसावला आहे.

याशिवाय सुबाभूळ ची लागवड कोणत्याही जमिनीत करता येणे शक्य असल्याने शेतकरी बांधवांकडे हा एक प्लस पॉइंट आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सुबाभूळ अर्थात सीपीएम 32 एक वेगाने वाढणारी वनस्पती आहे. ही वनस्पती केवळ 18 महिन्यात काढणीसाठी योग्य होते.

एवढेच नाही सुबाभूळ लागवड केल्यामुळे भविष्यात जमिनीचा पोत देखील सुधारणार आहे. कारण की सुबाभूळ नायट्रोजन वाढवणारे असल्याने यामुळे जमिनीची गुणवत्ता तसेच उत्पादकता वाढणार आहे. एवढेच नाही शेतकऱ्यांना कंपन्यांकडून सुबाभुळ बियाणे देखील उपलब्ध करून दिले जात आहेत. कंपनी परवडणाऱ्या दरात सुबाभूळ चे क्लोनल बियाणे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात देत आहेत. कंपनी शेतकऱ्यांकडून सुबाबाभूळचे लाकूड 3600 रुपये प्रति टन किंवा बाजारभावापेक्षा अधिक दर देऊन खरेदी करणार आहे.

एवढेच नाही लाकूड तोडण्यासाठी व वाहतुकीसाठी कंपनीकडून खर्च केला जाणार आहे. कंपनी शेतकरी बांधवांना सुबाभूळ शेतीसाठी काही सूचना देखील करते शेतकरी बांधव या सूचनांचे पालन करून केवळ 18 महिन्यात तीस ते चाळीस टन एकरी उत्पादन घेऊ शकतात. यामुळे खानदेशातील शेतकरी आता गुजरात मधील कागद कंपन्यांना भेटी देऊ लागले आहेत. एकंदरीत आगामी काळात खानदेश मध्ये सुबाभूळची शेती मोठ्या प्रमाणात नजरेस पडणार आहे.

संबंधित बातम्या:-

आंनदाची बातमी! गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर 'या' बाजार समितीचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; निर्णय छोटा पण लाख मोलाचा

खरं काय! शेतकऱ्याने जमीन राखायला ठेवले अस्वल; अस्वलास सॅलरी सुद्धा……

English Summary: Innovative experiments of farmers in Khandesh; Subabhul farming is a boon for farmers
Published on: 02 April 2022, 03:27 IST