News

तुरीचा हमीभाव ठरवण्यात आला आहे. तूरीला 6 हजार 300 इतका हमीभाव दर नाफेडच्यावतीने देण्यात आला आहे. तुरीची सध्या बाजारपेठेमध्ये आवक वाढत आहे. 1 जानेवारीपासून राज्यात 186 हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत.

Updated on 05 February, 2022 12:56 PM IST

तुरीचा हमीभाव ठरवण्यात आला आहे. तूरीला 6 हजार 300 इतका हमीभाव दर नाफेडच्यावतीने देण्यात आला आहे. तुरीची सध्या बाजारपेठेमध्ये आवक वाढत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली असली तरी योग्य दरातून भरपाई व्हावी या उद्देशाने हमीभाव केंद्र उभारण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार 1 जानेवारीपासून राज्यात 186 हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत.

हमीभाव ठरलेला असताना शेतकऱ्यांवर अन्याय

तूरीला 6 हजार 300 इतका हमीभाव दर नाफेडच्यावतीने देण्यात आला आहे. मात्र, हा दर शेतकऱ्यांना मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नागपूर येथील हमीभाव केंद्रावर वेगळेच वातावरण आहे. तुरीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिकच असल्याचे सांगत शेतकऱ्यांचा माल हा 5 हजार 100 ते 5 हजार 500 या दरम्यान खरेदी केला जात आहे. त्यामुळे ही केंद्र उभारुनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे सरकारनेच योग्य ते धोरण ठरवून तुरीची खरेदी करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या तुरीला 5 हजार 500 रुपयांपर्यंतचाच दर मिळत आहे. 6 हजार 300 रुपये दर हा नावालाच असून एकाही शेतकऱ्यास याप्रमाणे दर मिळत नाही हे वास्तव नागपूर येथील खरेदी केंद्रावर समोर आले आहे. तुर खरेदी केंद्राचा उद्देश सध्यातरी साध्य होताना दिसत नाही. कारण हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडेच तुरीची अधिकची विक्री होत आहे.

English Summary: Injustice to the farmers when the trumpet is guaranteed; Turi did not get a price at the guarantee center
Published on: 05 February 2022, 12:48 IST