News

शेतीला जोड व्यवसाय, पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन कडे पहायले जाते मात्र अजूनही शेतकरी याला व्यवसायच्या दृष्टिकोनातून न पाहता एक मर्यादित स्तरावर च पाहत आहेत.आता सरकारने स्वतः पशुपालन व्यवसाय वाढवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे जे की २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे म्हणून केंद्र सरकार आता पशुपालनव्यवसायकडे लक्ष देत आहेत. हरियाणा राज्य सरकारने या व्यवसायासाठी किसान क्रेडीट कार्ड ही योजना सुद्धा सुरू केली आहे.

Updated on 25 September, 2021 8:28 AM IST

शेतीला  जोड  व्यवसाय, पूरक  व्यवसाय म्हणून पशुपालनकडे  पहिले  जाते मात्र अजूनही शेतकरी(farmer ) याला  व्यवसायच्या दृष्टिकोनातून न  पाहता एक  मर्यादित  स्तरावरच  पाहत आहेत.आता सरकारने स्वतः पशुपालन व्यवसाय वाढवण्यासाठी पुढाकार घेतलेला  आहे जे की २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे  म्हणून केंद्र सरकार आता पशुपालन व्यवसायकडे लक्ष देत आहेत. हरियाणा राज्य सरकारने या व्यवसायासाठी किसान क्रेडीट कार्ड ही योजना सुद्धा सुरू केली आहे.

पशुपालन व्यवसाय योग्य नियोजन करणे गरजेचे:

किसान क्रेडिट कार्ड वर आता पर्यंत ६० हजार शेतकऱ्यांना ८०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आलेले आहे. एवढ्या सर्व सुविधा असताना शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून पशुपालन व्यवसाय चे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.पशुपालन चा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू करायचा असेल तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मधून ३ लाख  रुपयांचे स्वस्तात कर्ज भेटू शकते.कोणतीही हमी न घेता तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड वर १.६० लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. पशु किसान क्रेडिट कार्ड च्या उद्देशातून यासाठी कोण पात्र असेल आणि  कोणती  कागदपत्र  आवश्यक असतील याची माहिती आयएला माहीत आहे.

हेही वाचा:१६ हजारांची रोपे आणि लाखो रुपये खर्च करूनही शिमला मिरचीवर फिरवला नांगर

या योजनेच्या अंतर्गत जर पशु पालकाकडे गाई असेल तर त्यास एका गाई मागे त्याला ४०७८३ रुपये कर्ज भेटेल तर एका म्हशी मागे त्याला ६०२४९ एवढे कर्ज भेटेल. या कर्जाची रक्कम तुम्हाला ६ समान हप्त्यांमध्ये भेटणार आहे. जो लाभार्थी कर्ज घेणार आहे त्याला एका वर्षात ४ टक्के व्याजाणे पैसे माघारी करावे लागणार आहेत.

तीन लाख अर्ज रद्द:-

राज्य सरकारने पाच लाख  पेक्षा  जास्तच  पशुपालकांचे  अर्ज बँकांना पाठवले आहेत त्यामधील सुमारे ३ लाख लोकांचे अर्ज बँकेने नाकारले आहेत आणि फक्त १.२५ लाख अर्ज मंजूर केले आहेत.हरियाणा मधील शेतकऱ्यांचे शेती सोबत पशु पालनावर सुद्धा खूप भर आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज सुद्धा सहजपणे उपलब्ध करून दिले जाते.

कोणत्या प्राण्यावर किती कर्ज आहे:-

१.६० लाख रुपये पर्यंत कर्ज घेण्यास कोणतीही हमी ची गरज भासणार नाही:

१. एका म्हशी मागे तुम्हाला ६०,२४९ रुपये एवढे कर्ज भेटणार आहे.
२. एका गाई मागे तुम्हाला ४०,७८३ रुपये एवढे कर्ज भेटणार आहे.
३. तुम्हाला मेंढ्या आणि शेळ्यांसाठी ४०६३ रुपये कर्ज भेटणार आहे.
४. एका कोंबडी मागे तुम्हाला ७२० रुपये कर्ज भेटणार आहे.

कार्ड किती दिवसांत मिळेल:-

१. तुम्हाला यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड ची आवश्यकता भासणार आहे.
२. तुम्ही अर्ज केल्यानंतर केवायसी करून घ्याल तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल.
३. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला १ महिन्यात अॅनिमल क्रेडिट कार्ड भेटेल.

या आहेत अटी:-

१. प्राण्यांचे आरोग्य प्रमाणापत्र असणे आवश्यक आहे.
२. ज्या प्राण्यांवर विमा उतरवला आहे त्यांनाच कर्ज दिले जाईल.
३. सिव्हिल ठीक असणे गरजेचे तेव्हाच कर्ज भेटेल.
४. सर्वात महत्वाचे म्हणजे हरियाणा चा रहिवासी असणे गरजेचे आहे.

English Summary: Initiatives taken by the government to increase animal husbandry, now loans will be available through animal credit cards
Published on: 25 September 2021, 08:28 IST