सध्या आपले शेजारील राष्ट्र श्रीलंकेमध्ये हाहाकार माजला असून लोकांनी रस्त्यावर येऊन आक्रोश करायला सुरुवात केली आहे.
औषधांचा साठा संपल्याने डॉक्टरांनी रुग्णांचे ऑपरेशन देखील थांबवले आहेत. पेट्रोल भरायचे असेल तर 2 किमीच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. दुधाची किंमत पेट्रोल पेक्षा जास्त महाग आहे. हे तर सोडाच एक कप चहा ची किंमत शंभर रुपये झाली आहे. घरात प्रत्येकाला दररोज मिरची लागते. परंतु मिरची खरेदी करणे आता स्वप्नात पाहण्यासारखी गोष्ट श्रीलंका नागरिकांची झाली आहे. कारण मिरची थोडी थोडकी नव्हे चक्क सातशे रुपये किलो झाली आहे. अहो एवढेच काय बटाटे घ्यायचे असतील तर दोनशे रुपये द्यावे लागत आहे. आता ठीक आहे आपण आता ही परिस्थिती वाचली, परंतु श्रीलंकेची ही परिस्थिती का अशी झाली? हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल.
नक्की वाचा:जवाहर मॉडेलचा करा पिके घेण्यासाठी वापर, होईल कमी खर्चात जास्त उत्पादन
श्रीलंकेवर इतर देशांचे कर्ज
श्रीलंकेवर अनेक देशांचे कर्ज आहे. जानेवारी महिन्याचा विचार केला तर श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा 70 टक्क्याहून अधिक घसरला व 2.36 अब्ज डॉलर झाला होता. त्यामध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. श्रीलंकेमध्ये परकीय चलनाचा कमतरता झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तू, औषधे तसेच पेट्रोल व डिझेल विदेशातून आयात करता येत नाहीये.
येथील अहवालात देशातील महागाईच्या आकडेवारी मांडण्यात आली होती. त्यानुसार जानेवारीतील या अहवालात असे सांगण्यात आले होते की, नोव्हेंबर 2021ते डिसेंबर 2021 या एका महिन्यात श्रीलंकेतील अन्नधान्य महागाई 15 टक्क्यांनी वाढले होते. यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली असून एकच महिन्यामध्ये मिरचीचे भाव 287 टक्क्यांनी वाढले, वांग्याचे भाव 51 टक्क्यांनी तर कांद्याचे भाव 40 टक्क्यांनी वाढले आहेत. आता पेट्रोल दर घ्यायचे राहिले तर पेट्रोलची किंमत 254 रुपये प्रति लिटर झाली आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे दूध 263 रुपये लिटर मिळत आहे. एक किलो साखर घ्यायचे असेल किंवा तांदूळ घ्यायचा असेल तर 290 रुपये किलो झाला आहे.
श्रीलंका च्या रुपयात 45 टक्क्यांपर्यंत घसरण
आता पण ही आकडेवारी बघितली तर किती भयानक असेल याचा अंदाज बांधता येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीलंकेच्या रुपयांमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मध्ये श्रीलंकेचा रुपया मार्च महिन्यातही आत्तापर्यंत 45 टक्क्यांनी घसरला आहे. एक मार्चपासून श्रीलंकेचे चलन डॉलरच्या तुलनेत तुटून 292.5 या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आले आहे.
या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे श्रीलंकेचे अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. कोरोना महामारी मुळे पर्यटन उद्योगात अडचणीत आल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. आधीच जीडीपीमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे श्रीलंकेचे पर्यटन क्षेत्र आधीच संकटातून जात होते, ज्या उद्यापर्यंत सावरलेले नाही. श्रीलंकेवर 32 अब्ज डॉलरचे इतर देशांचे कर्ज आहे.कोरोना महामारी सुरू झाल्यापासून श्रीलंकेतील पाच लाख लोक गरिबीच्या गर्तेत अडकले आहेत.
Published on: 03 April 2022, 07:52 IST