सध्या स्वयंपाकघरातील बऱ्याच गोष्टी महागल्या आहेत. कडधान्य असो किंवा तेल तसेच एलपीजी गॅस आणि आता तर गव्हाचे पीठ देखील महागले आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईचा सामना करत असतानाच आता गव्हाच्या पिठात वाढ करण्यात आली आहे. गव्हाच्या धान्यात वाढ झाली परिणामी गव्हाच्या पिठाचे भाव देखील वाढले. रिटेल बाजारात गव्हाच्या पीठाचा सरासरी दर हा जवळपास 32.91 प्रति किलो इतका झाला आहे. मागील एका वर्षात पीठाच्या दरात जवळजवळ 13 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
आता गव्हाच्या पिठाच्या वाढत्या दराचा थेट परिणाम हा जेवणाच्या थाळीवर पडणार आहे. मागच्या वर्षी मे महिन्यात गव्हाच्या पिठाचा दर हा प्रति किलो 29.14 इतका होता. ग्राहक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गव्हाच्या पिठाचा कमाल दर हा 59 रुपये प्रति किलो असून किमान दर हा 22 रुपये प्रति किलो इतका आहे. म्हैसूरमध्ये पिठाचा दर 54 रुपये प्रति किलो, मुंबईत 49 रुपये प्रति किलो, चेन्नईत 34 रुपये प्रति किलो, कोलकातामध्ये 29 रुपये प्रति किलो आणि दिल्लीत 27 रुपये प्रति किलो इतका दर सुरू आहे.
आगामी काळात गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. वर्ष 2021-22 मध्ये रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. असा सरकारने अंदाज व्यक्त केला आहे. तसेच यंदा उन्हाच्या झळा लवकरच बसू लागल्याने 111.32 दशलक्ष टन उत्पादनाऐवजी 105 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
गरज भासल्यास फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला OMSS च्या माध्यमातून गव्हाची विक्री केली जाते. बाजारपेठेत गव्हाचा पुरवठा कमी होऊ नये हा त्यापाठीमागील उद्देश होय. बाजारात गव्हाचा पुरवठा कमी झाल्यास FCI कडून हे पाऊल उचलले जाते. मागणी वाढली तरी FCI मुळे गव्हाच्या किंमती या स्थिर राहण्यास मदत होते. परिणामी महागाईचा फटका बसत नाही.
मात्र अजूनही सरकारकडून खुल्या बाजारात गहू विक्रीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. खुल्या बाजारात गव्हाची विक्री करून सरकार मागणी आणि किंमती नियंत्रित करते. सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही तर जून महिन्यापासून गव्हाच्या पिठाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईदेखील आणखी तीव्रपणे वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
राहिबाई पोपेरे यांनी सेंद्रीय शेतीचा आदर्श जनमाणसात पोहचवला : शरद पवार
ब्रेकिंग : भर सभेत प्रांत अधिकाऱ्याची तक्रार थेट अजित पवारांकडे, आणि पुढे...
महाराष्ट्राचे आकर्षण आणि रोमांचक पेटत्या कठ्यांची भरली यात्रा
Published on: 10 May 2022, 03:21 IST