गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात लंपी रोगाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामुळे आता याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यामुळे आता काळजी घेणे गरजेचे आहे. यावर आता उपाययोजना केल्या जात आहेत. लंपी रोगाचा फैलाव देशातल्या महाराष्ट्रासह (Maharashtra) इतर 11 राज्यांमध्ये झाला आहे.
यामध्ये हजारो जनावरांचा मृत्यू झाला आहे तर ११ लाखांहून अधिक संक्रमित जनावरे समोर आली आहेत. असे असताना आता जनावरांमधील लंपी या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भारतामधील शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. या लसीकरणाबरोबरच तपासणी चाचण्यांना वेग देऊन जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन हा आजार अटोक्यात आणला जाईल.
गेल्या काही दिवसांपासून जनावरांना त्वचेचा आजार होत आहे. राजस्थानमध्ये जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात असून 2025 पर्यंत देशातील प्रत्येक जनावराला तोंडाच्या आणि पायाच्या आजावर लस दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिटमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांचा दुष्काळच हटणार! उसाला 3600 रुपये दर करा, राज्य सरकारची मोदी सरकारकडे मागणी
शेती उत्पदनात कमी-अधिक झाले तरी याच जोड व्यवसायावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यामुळे जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायावर मार्गदर्शन केले जात आहे. जगभरातील 156 तज्ञ हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
पतसंस्थाना सीबील लागू होणार? राज्य सरकारची मोदी सरकारकडे मागणी..
दूध उत्पादन वाढीसाठी ही परिषद महत्वाची राहणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीबाबतही माहिती होऊ शकते. दरम्यान, आतापर्यंत लाखोंहून अधिक जनावरांना या विषाणूची लागण झाली आहे. राजस्थान आणि गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या देशात त्वचारोगाची पहिली प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर काही महिन्यांतच त्वचेचा रोग देशाच्या १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचला आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! लंपी रोगाचा हाहाकार, बारामती अॅग्रोच्या माध्यमातून १ लाख मोफत लसी उपलब्ध
१०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता, करोडो रुपये जप्त, सोलापूरमध्ये खळबळ...
शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार 50 हजार रुपये, मोदींचा निर्णय..
Published on: 13 September 2022, 09:42 IST