News

शेतामध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात आणि दर्जदार व्हावे म्हणून शेतात वेगवेगळे प्रयोग केले जातात. हे प्रयोग कधी विज्ञानाचा आधार घेऊन केले जातात तर कधी शेतकरी स्वतःच निर्णय घेतो जो की याचा अनुभव आपल्याला अनेक वेळा येतो. एकाने जर आपल्या शेतामध्ये एक प्रयोग केला तर दुसरे सुद्धा हाच बघून प्रयोग करतात. आपल्या कांद्याला एक वेगळी चकाकी यावी म्हणून शेतकरी आता कांद्यावर देशी दारू ची फवारणी करत असल्याचे चित्र समोर आले आहे जे की कांद्याला तरतरी यावी म्हणून देशी दारू पाजली जात आहे.

Updated on 17 November, 2021 4:31 PM IST

कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते:

परंडा तालुक्यात पाण्याची मुबलक सोय असल्याने त्या क्षेत्रात सिंचनाचे प्रमाण वाढले आहे. परंडा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बार्शी आणि सोलापूर बाजार समितीमध्ये जो कांद्याला मिळणारा भाव आहे तो भाव परंडा येथील बाजार समितीमध्ये मिळत आहे. ही बाजारपेठ चांगली असल्यामुळे या  बाजारपेठेत  करमाळा, जामखेड, भूम, कुर्डुवाडी, माढा, टेभुर्णी, कर्जत, राशीन या भागातील शेतकरी आपला कांदा घेऊन या बाजारपेठेत विक्री करण्यासाठी येत आहेत.

कांद्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने उसाच्या  प्रमाणातच  कांद्याची सुद्धा  लागवड  शेतकरी करत  आहेत. प्रत्येक  शेतकरी आपल्या शेतात चांगले उत्पादन यावे म्हणून वेगवेगळे प्रयोग करत असतो. धुई पडल्यामुळे कांद्याची पात जळते तसेच कांद्यावर रोगही पडतो आणि यामधून कांद्याला वाचवायचे असेल तर शेतकरी त्यावर देशी दारूची फवारणी करत आहेत या देशी दारूची फवारणी केल्याने कांद्यावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव पडत नाही.

यामुळे कांदा फुगतो आणि त्याला रंग सुद्धा येतो आणि कांद्याला तरतरी येते असे कांदा उत्पादक शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. कांद्याची तरतरी वाढावी म्हणून शेतकऱ्यांचा दर देशी दारूकडे वाढलेला आहे.

English Summary: Indigenous liquor is sprayed to protect onions from disease
Published on: 17 November 2021, 04:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)