News

जागतिक कापूस उत्पादन २०२०-२१ मधील हंगामात उद्दिष्टा एवढे होण्याचे संकेत आहेत. जगभरात २७ दशलक्ष मेट्रिक टन कापूस उत्पादन होईल. यावेळी भारतात सुमारे ४०० लाख कापूस गाठींचे उत्पादन होईल व भारत जगात क्रंमाक एकचा कापूस उत्पादक देश ठरेल, असेही संकेतही जाणककारांनी दिले आहेत.

Updated on 26 August, 2020 6:35 PM IST


जागतिक कापूस उत्पादन  २०२०-२१ मधील हंगामात उद्दिष्टाएवढे होण्याचे संकेत आहे.  जगभरात  २७ दशलक्ष  मेट्रिक टन कापूस उत्पादन होईल. यावेळी भारतात सुमारे ४०० लाख कापूस गाठींचे उत्पादन होईल व भारत जगात क्रंमाक एकचा कापूस उत्पादक देश ठरेल, असेही संकेतही जाणककारांकडून मिळाले आहेत. कापूस लागवडीतही भारत जगात पहिल्या क्रमांकावर असून देशात १२७ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाल्याचा अंदाज आहे.

लागवडीसंबधीची अंतिम माहिती लवकरच देशातील कृषी व शेतकरी कल्याण विभागाकडून जारी होण्याची शक्यता आहे. गेल्या  हंगामात देशात १२२ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. गेल्या हंगामात  अतिपावसात पूर्वहंगामी कापसाचे नुकसान झाले. यंदाही अतिपाऊस झाला आहे.  देशात महाराष्ट्रात सर्वाधिक सुमारे ४२.२३ लाख हेक्टर कापसाची लागवड झाली आहे. यापाठोपाठ गुजरातेत सुमारे २५  लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे.  तेलंगणात लागवड वाढली आहे. देशात कोरडवाहू कापूस पीक अधिक आहे. गुजरातते ४५ टक्के क्षेत्रातील  कापूस पिकाला सिंचनाची व्यवस्था आहे. तेलंगणा व महाराष्ट्रातली सुमारे ८२ ते ८३ टक्के कापासाखालील क्षेत्राला सिंचनाची व्यवस्था नसल्याने  या भागात कोरवाहू कापूस पीक अधिक आहे.

यंदा देशात मॉन्सून वेळेत दाखल झाला . यामुळे हंगामी किंवा कोरडवाहू कापूस पीक बऱ्यापैकी आहे. यामुळे देशात महाराष्ट्र, गुजरात व तेलंगाणा या  प्रमुख कापूस पिकाचे चित्र आशादायी असल्याचे  जाणकारांचे म्हणणे आहे.  उत्तर भारतातील सुमारे १४ लाख हेक्टरवरील कापूस पिकाची स्थितीदेखील सद्स्थितीत चांगली आहे. भारतात ४०० लाख कापूस गीठींचे उत्पादन अपेक्षिच आहे. जगात चीनमध्ये ३५५ ते ३६० गाठींचे उत्पादन  होऊ शकते. मेरिकेत २६५  ते २७० लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. पाकिस्तानातही सुमारे  २७ लाख हेक्टर कापूस लागवड झाली असून तेथे सुमारे १२२ ते १२५ लाख गाठींचे उत्पादन होईल. 

दरम्यान तेथील जिझियांग, यंगत्से नदीच्या लाभा क्षेत्रात कापूस पिकाला अतिपावसाचा फटका बसलवा आहे. अमेरिकेतील प्रमुख कापूस उत्पादक राज्य असलेल्या  टेक्सासला वादळाचा फटका बसून कापूस पिकाची काहीशी हानी झाली आहे. परंतु यंदा भारातातील कापूस लागवड वाढली आहे. ऑस्ट्रेलियात  ५० ते ५५ लाख कापूस गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

English Summary: Indications of increase in global cotton production
Published on: 26 August 2020, 06:34 IST