जगातील अनेक देशांपैकी भारत हा देश सर्वात जास्त तांदूळ निर्यात करतो. भारताने परदेशात आपला ६.६ दशलक्ष बासमती तांदूळ पाठवला आहे. ६५२९७ कोटी रुपयांवर भारताची तांदूळ निर्यात गेली आहे जे की २०१९-२० मध्ये ४५,४२६ कोटी रुपये तांदळाची निर्यात केली होती.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या तांदूळ निर्यातीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे पण ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशन चे संचालक विनोद कौल यांनी असे सांगितले आहे की आम्ही तांदळाची निर्यात चांगल्या प्रकारे करत आहोत त्यामुळे मागील वर्षापेक्षा यावर्षी आम्ही १४ ते १५ दशलक्ष टन अधिक तांदूळ निर्यात करू शकेल. त्यामुळे बिजनेस लाईन चिंतेत नसल्याचे दिसून येत आहे.
तुम्हाला माहीत आहे की जगातील अनेक देशांपैकी भारत या देशांमध्ये सर्वात जास्त तांदळाची निर्यात होते कारण भारतामध्ये अनेक अशी राज्य आहेत ज्या राज्यातील शेतकरी आपल्या शेतामध्ये भात पिकवतात त्यामुळे भारताला सर्वाधिक तांदूळ निर्यात देश म्हणून ओळखतात.येईल या वर्षांमध्ये तांदूळ बाजारात भारत देश आपला दबदबा कायम ठेवेल अशी शक्यता वर्तवली आहे जे की उद्योग व व्यापार वर्ग असलेल्या तज्ञांचे असे मत आहे की गेल्या वर्षात भारत देशाने तांदूळ निर्यात १३.०८ दशलक्ष टन एवढी केली होती जसे की मालवाहतुकीपेक्षा जास्त झाली होती.
निर्यातीमध्ये झाली वाढ -
गैर बासमती तांदूळ निर्यातीमध्ये वाढ झाली आहे असा अंदाज सरकारने लावलेला आहे तसेच काही देशांकडे अजूनही तांदळाचा साठा बरयापैकी प्रमाणात आहे. नवी दिल्ली मधील जे विश्लेषक आहेत त्यांचे असे मत आहे की जो पर्यंत तांदळाच्या किमती कमी होत नाहीत तोपर्यंत आयातदार तांदूळ घेणार नाहीत तसेच मागील काही दिवसांपासून तांदळाच्या किमती कमी झालेल्या आहेत. मागील १६ महिने घेतले तर त्याच्या तुलनेमध्ये सध्याच्या तांदळाच्या किमती कमी आहेत.
हेही वाचा:रासायनिक खते वापर केल्याने शेतीमध्ये आणि मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम
आफ्रिका आणि बांग्लादेशात चांगली निर्यात -
एप्रिल महिन्यात १५ टक्के बासमती तांदळाची निर्यात कमी झाली आहे तसेच मे महिन्यात सुद्धा तांदळाची निर्यात कमीच झालेली आहे. आफ्रिका व बांगलादेश मधील लोकांनी तांदळाची निर्यात चांगल्याच प्रकारात केली आहे अशी माहिती मुंबई मधील व्यापाऱ्यांनी दिलेली आहे.बांगलादेश मध्ये यावर्षी एक दशलक्ष बासमती तांदूळ निर्यात झालेली आहे जसे की बांग्लादेश हा भारताकडून तांदूळ आयात करणारा सर्वात मोठा देश म्हणले जाते.तेलंगणा व आंधरप्रदेश या राज्यांमध्ये नवे पीक आल्यामुळे भारताच्या निर्यातीला अधिक प्रमाणात चालना मिळाली आहे अशी माहिती द राईस एक्सपोर्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष बी.वी कृष्ण राव यांनी दिलेली आहे.
Published on: 22 July 2021, 07:39 IST