News

सध्या कोल्हापूरमध्ये सर्वांत मोठ्या अंड्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तळसांडे गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये हाय-लाइन डब्ल्यू-80 जातीच्या कोंबड्याने 210 ग्रॅम वजनाचे अंडे दिले आहे. यामुळे याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Updated on 20 October, 2022 3:27 PM IST

सध्या कोल्हापूरमध्ये सर्वांत मोठ्या अंड्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तळसांडे गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये हाय-लाइन डब्ल्यू-80 जातीच्या कोंबड्याने 210 ग्रॅम वजनाचे अंडे दिले आहे. यामुळे याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हे अंडे भारतातील सर्वात मोठे आणि वजनदार अंडे असल्याचे म्हटले जाते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून चिकन आणि अंडी दोन्ही चर्चेत आहेत. यामुळे हे अंडे बघण्यासाठी देखील अनेकांनी हजेरी लावली होती.

या अंड्याचे वजन 210 ग्रॅम आहे. हाय-लाइन डब्ल्यू-80 जातीच्या कोंबडीने पोल्ट्री फार्ममध्ये 210 ग्रॅम वजनाचे अंडे घातले आहे. आतापर्यंत सर्वात वजनदार कोंबडीच्या अंड्याचे वजन 162 ग्रॅम होते. ते पंजाबच्या एका कोंबड्याने दिले होते.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३ कोटी १८ लाखांचे अनुदान वितरीत

दरम्यान, कोंबडीच्या अंड्याचे वजन 54 ते 100 ग्रॅम दरम्यान असते. कधीकधी क्वचित प्रसंगी अंड्याचे वजन 140 ग्रॅम पर्यंत असू शकते. मात्र कोल्हापूरमध्ये वजन जास्तच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

'बदलत्या वातावरण आणि तंत्रज्ञानाशी तरुणांना जोडण्यासाठी लघु उद्योग भारती कार्यरत'

या अंड्याचे वजन पाहून मला आश्चर्य वाटले. मी गेल्या 40 वर्षांपासून पोल्ट्री व्यवसायात आहे, मात्र एवढी मोठी अंडी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती, असे येथील पोल्ट्री व्यवसायिकांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:
सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही- कृषीमंत्र्यांची माहिती
माळेगाव कारखान्याला १० गावे जोडण्याच्या निर्णयाला प्रादेशिक सहसंचालकांची स्थगिती, संचालक मंडळाला मोठा धक्का
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा ऊसदर जाहीर

English Summary: India's biggest egg in Kolhapur! 210 gram egg laid by chicken..
Published on: 20 October 2022, 03:27 IST