मागील काही वर्षांमध्ये भारताच्या बिगर बासमती तांदळच्या निर्यातीत दिवसेंदिवस वाढत झालेली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये भारताने ६.११ अब्ज डॉलर्सची बिगर बासमती तांदळाची निर्यात केलेली आहे असे वाणिज्य मंत्रालय आणि केंद्रीय उद्योगाने जी प्रसिद्ध केलेले पत्र आहे आहे पत्रात नमूद केलेले आहे. तर २०१३-१४ मध्ये भारताने जो बिगर बासमती तांदूळ निर्यात केला होता तो २.९२ अब्ज डॉलर वर गेला होता. २०२०-२०२१ या वर्षांमध्ये भारताने बिगर बासमती तांदळाची निर्यात ही ६.११ अब्ज डॉलर्स ची केलेली होती. २०२०-२०२१ मध्ये भारताने जगातील सुमारे १५० देशांना बिगर बासमती तांदूळ पुरवला होता.
२०२१-२२ मध्ये ६.११ अब्ज डॉलर्स ची उलाढाल :-
व्यावसायिक वार्ता आणि सांख्यिकी महासंचलनालयाने काढलेल्या आकडेवाडीनुसार २०१९-२०२० या अर्थिक वर्षांमध्ये भारताने जवळपास २ अब्ज डॉलर्स चा बिगर बासमती तांदळाची निर्यात केलेली होती. तर २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांमध्ये भारताने ४.८ अब्ज डॉलर्स ची बिगर बासमती तांदळाची निर्यात केलेली होती. २०२१-२०२२ या अर्थील वर्षात भारताने जवळपास ६.११ अब्ज डॉलर्स ची बिगर बासमती तांदळाची निर्यात केलेली होती.
भारताकडून या देशात पुरवला जातो बिगर बासमती तांदूळ :-
अपेडाचे अध्यक्ष एम.अंगमुथू सांगतात की तांदळाच्या निर्यातिचे प्रमाण वाढवण्यासाठी संबमधीत देशासोबत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून उत्पादनाचा दर्जा वाढवन्यात भर देण्यात आलेला आहे. नेपाळ, बांगलादेश, चीन, कोट डील्व्होरी, टोगो, सेनेगल, व्हिएतनाम,मादागास्कर, सोमालिया, मलेशिया, डिजिबोटी, सौदी अरेबिया, सौरी अरब अमिराती, गुइनीआ, पश्चिम आफ्रिकन देश बेनिन या सर्व देशांना भारताकडून बिगर बासमती तांदूळ निर्यात केला जातो.
तांदूळ उत्पादनात जगात भारताचा दुसरा नंबर :-
भारतातील तांदुळ उत्पादक राज्य ही पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार,छत्तीसगड, ओडिशा, आसाम ही आहेत. २०२०-२०२१ या अर्थिक राज्यामध्ये भारतामधील एकूण तांदूळ उत्पादन हे १२८ दशलक्ष टनांवर गेले आहे असा अंदाज सरकारकडून मांडण्यात आलेला आहे. मागील ५ वर्षात एकूण तांदूळ उत्पादन हे ११६ दशलक्ष टनावर राहिले आहे. तांदूळ उत्पादनात जगात सर्वात पहिला नंबर हा चीन आणि दुसरा भारताचा लागतो.
Published on: 21 April 2022, 05:25 IST