भारतीय रेल्वेची रेल व्हील फॅक्टरी ट्रेड अप्रेंटिसच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित करत आहे आणि इच्छुक उमेदवार rwf.indianrailways.gov.in या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. एकूण १९२ जागा रिक्त आहेत आणि रेल्वे व्हील फॅक्टरी (आरडब्ल्यूएफ) अप्रेंटिस भरती २०२१ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२१ आहे. इच्छुक उमेदवार रेल्वेच्या नोकरीसाठी १३ सप्टेंबरपर्यंत पदांसाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे संबंधित विषयातील नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) कडून नॅशनल ट्रेड अप्रेंटिस प्रमाणपत्र देखील असावे.
हेही वाचा : आता ड्रायव्हिंग लायसन्स बागळण्याची गरज नाही, अन् पोलीस चलनही कापणार नाहीत; फक्त करा हे
वयोमर्यादा
अर्ज सादर करायला १३ ऑगस्ट २०२१ रोजी सुरू झाले आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२१ आहे. आरडब्ल्यूएफ ट्रेड अप्रेंटिस वयोमर्यादा नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार १५ ते २४ वर्षे वयाचे असले पाहिजेत तर सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वरच्या वयोमर्यादेमध्ये शिथिलता दिली जाईल.
पगार
निवडलेल्या उमेदवारांना १२,२६१ रुपये मासिक मानधन दिले जाईल.निवड प्रक्रिया उमेदवारांना दहावीत मिळालेले गुण आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे पदांसाठी निवडले जाईल.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rwf.indianrailways.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑफलाइन अर्जांसाठी, ते कागदपत्रांसह अर्ज मुख्य मुख्य कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलाहंका, बंगलोर -560064 या कार्यालयात १३ सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात.
Published on: 10 September 2021, 10:46 IST