News

भारत हा विविधतेने नटलेला आहे. ही विविधता परंपरा, धार्मिक, अन्न संस्कृतीच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रेल्वेकडून एक कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत आहे. आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी प्रत्येक गाव तसेच शहराचे वेगवेगळ्या बाबतीत वेगळे वैशिष्ट्य आहे.

Updated on 22 July, 2022 4:09 PM IST

भारत हा विविधतेने नटलेला आहे. ही विविधता परंपरा, धार्मिक, अन्न संस्कृतीच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रेल्वेकडून एक कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत आहे. आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी प्रत्येक गाव तसेच शहराचे वेगवेगळ्या बाबतीत वेगळे वैशिष्ट्य आहे.

हेच वैशिष्ट्य जपत तसेच इतर राज्यातील रेल्वे प्रवाशांना या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची ओळख व्हावी व स्थानिक वस्तूंच्या आदान-प्रदान त्या माध्यमातून खाद्यपदार्थांची चव चाखता यावी यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील 13 रेल्वेस्थानकांवर बस स्टेशन वर प्रॉडक्ट अंतर्गत 15 स्टॉल्स उभारले आहेत.

नक्की वाचा:'AJAI' कृषी पत्रकारितेतील ऐतिहासिक क्षण: केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला!

 या स्टॉलच्या माध्यमातून संबंधित शहरातील विशेष वैशिष्ट्य असलेले खाद्यपदार्थ तसेच वेगवेगळ्या वस्तू विक्रीला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या माध्यमातून स्थानिक वस्तूंना रेल्वेच्या माध्यमातून बाजारपेठ मिळणार आहे. रेल्वेने मागच्या आठवड्यापासून वन स्टेशन वन प्रोडक्ट हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

त्यातील पहिल्या टप्प्यात भुसावळ विभागांमधील तेरा रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला असून  या तेरा स्थानकांवर विविध ठिकाणी त्या त्या विभागातील वस्तू, हस्तकला तसेच खाद्यपदार्थ, केळीचे वेफर्स पापड, गुळपट्टी, ड्रायफ्रूट तसेच कृषी साहित्य, सेंद्रिय उत्पादन विक्रीचे एकूण पंधरा स्टॉल उभारले गेले आहेत.

नक्की वाचा:मोठी बातमी; अकाऊंटमध्ये झीरो रक्कम असली तरी काढता येणार, पहा प्रोसेस..

त्यामुळे वेगळी वस्तू संबंधीत स्थानकावर विकण्यासाठी आल्याने प्रवाशीदेखील कुतुहलाने त्याकडे आकर्षित होतात.

ज्या विक्रेत्यांनी हे स्टॉल्स उभारले आहे त्यांच्याकडून पंधरा दिवसांसाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार असून  पंधरा दिवसानंतर पुन्हा परवानगीचे  रिनीवल केले जाणार आहे. सुशिक्षित बेरोजगार तसेच स्वयंसेवी संस्था देखील या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.

नक्की वाचा:शेतकऱ्यांचे आले सुगीचे दिवस ! गेल्या 6 आठवड्यात गव्हाच्या किंमतीत 14 टक्यांनी वाढ..

English Summary: indian railway start one station one product is admirable programme
Published on: 22 July 2022, 04:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)