News

द्राक्ष आणि नाशिक जिल्हा यांचे वेगळेच नाते आहे. नाशिकची द्राक्ष हे जगात प्रसिद्ध आहेत आणि द्राक्ष मुळे नाशिकला आंतरराष्ट्रीय ख्याती आहे.नाशिकच्या द्राक्षांना नुकतेच जी आय मानांकन प्राप्त झाले आहे.

Updated on 01 September, 2021 11:20 AM IST

 द्राक्ष आणि नाशिक जिल्हा यांचे वेगळेच नाते आहे. नाशिकची द्राक्ष हे जगात प्रसिद्ध आहेत आणि द्राक्ष मुळे  नाशिकला आंतरराष्ट्रीय ख्याती आहे.नाशिकच्या द्राक्षांना नुकतेच जी आय मानांकन प्राप्त झाले आहे.

 अशा या नाशिकच्या जगप्रसिद्ध द्राक्षांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी टपाल विभागाच्या वतीने मंगळवारी नाशिक ग्रेप्स या विशेष तिकिटाचे अनावरण करण्यात आले.

 नाशिक मध्ये उत्पादित होणाऱ्या द्राक्षांना आंतरराष्ट्रीय स्थळावर ऐतिहासिक व पारंपरिक मूल्य प्राप्त व्हावे, तसेच नाशिकच्या द्राक्ष जागतिक स्तरावर पोहोचावेत यासाठी तसेच हा वारसा जतन करण्यासाठी भारतीय टपाल विभागाने पुढाकार घेत नाशिक ग्रेप्स आहे विशेष टपाल पाकीट काढले आहे.

नवी मुंबईचेविशेष डाग निदेशक सरणया, विभागीय सहसंचालक कृषी विभागाचे संजीव पडवळ,अधीक्षककृषी अधिकारी सुनील वानखेडे, नाशिक द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष रवी बोराडे, बीएसएनएल चे वरिष्ठ जनरल मॅनेजर नितीन, टपाल संग्राहक शांतीलाल हिरण इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत या पक्षाच्या अनावरण करण्यात आले आहे

 काय आहे विशेष टपाल पाकिटाचे महत्त्व?

 

 विशेष टपाल लिफाप्याला  आंतरराष्ट्रीय संग्रहकांच्याजगात विशेष महत्त्व आहे.असेपाकीट एकदाच प्रकाशित होतात त्यामुळे त्यांना विशेष मागणी असते.या नागरिकांना टपाल तिकिटांचाआणि पाकिटांचा संग्रह करण्याचा छंद असतो असे नागरिक ते आवर्जून खरेदी करतात. नाशिकच्या द्राक्षांना विशेष मानांकन प्राप्त झाल्यामुळे तसेच या द्राक्षांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रॅण्डिंग करण्याच्या उद्दिष्टाने हे अनावरण करण्यात आले आहे.

English Summary: indian postal department launch nashik grapes pockets
Published on: 01 September 2021, 11:20 IST