कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईव कॉपोरेशनने ग्राहकांना एक आवाहन केले आहे. सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये ग्राहकांनी आपल्या गरजेपुरतेच बुकिंग करावे , असे आवाहन सरकारी तेल कंपनीकडून करण्यात आले आहे. बुकिंग करताना होत त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, घरगुती गॅसची बुकिंग आता १५ दिवसांच्या अंतराने केली जाणार आहे. याविषयी माहिती इंडियन ऑईलचे अध्य़क्ष संजीव सिंह यांनी दिली आहे. यासह त्यांनी ग्राहकांना विश्वास दिला, की घरगुती गॅसचा पुरवठा पुरेसा आहे.
एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी याविषयीची माहिती दिली. 'पेट्रोल, डिझेल, आणि घरगुती गॅसचा पुरवठा पुरेसा आहे. विशेषत घरगुती गॅसविषयी मी लोकांना सांगू इच्छितो की, तुम्ही निश्चित रहावे. एलपीजीचा पुरवठा व्यवस्थित चालू आहे, आणि चालू राहिल. ग्राहकांना विनंती आहे की, त्यांनी पॅनिक बुकिंग करु नये. यामुळे यंत्रणेवर दबाब पडतो. आम्ही ही बुकिंग व्यवस्था साधारण १५ दिवसांच्या अंतराने करणार आहोत'. म्हणजेच तुम्हाला गॅस भरायचा असेल तर तुम्ही १५ दिवसांआधी बुकिंग करावे, असे त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. पितृशोकात न राहता इंडियन ऑईलचे संचालक इंधनाच्या पुरवठ्याचे नियंत्रण करत होते. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेच्या अदल्या दिवशी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉपोरेशनचे संचालक संजीव सिंह यांच्या वडिलांचे निधन झाले होते. परंतु पितृशोकात न अडकता इंधनाचा पुरवठा व्हावा, यासाठी ते २४ तासात कामावर परतले.
Published on: 30 March 2020, 06:27 IST