News

या देशाचे शेतीचे प्रश्न काय आहेत आणि किती आहेत त्यांनी उत्तर दिलं की, १० तोंडी रावण असतो तसे शेतीचे प्रश्न आहेत. तो एकच प्रश्न आहे असं नाही, पाण्याचा प्रश्न, जमिनीचा पोत कसा सांभाळायचा?, कोणते बियाणे चांगले कोणते नकली?, गुंतवणूक केल्यानंतर त्याला मिळणारी किंमत ही योग्य आहे का?

Updated on 20 January, 2024 12:33 PM IST

Agriculture News : बारामती शेजारील माळेगाव येथे कृषी विज्ञान केंद्रात 'कृषिक-२०२४' कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी कर्नाटक कृषी खात्याचे मंत्री एन.चालुवराय स्वामी, त्यांच्या पत्नी, शरद पवार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना शरद पवार यांनी ते केंद्रीय कृषिमंत्री असतानाच्या काही शेती प्रश्नांच्या विरोधकांच्या आठवणींना उजाळाला दिला आहे. तसंच त्यांच्या काळातील शेतीबाबतचे प्रश्न, विरोधकांचे आंदोलन, कांद्याचे दर असे अनेक मुद्दे त्यांनी सांगितले आहेत.

कार्यक्रमाला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, शेतीच्या क्षेत्रामध्ये दुनियेत बदल होत आहेत. नवनवीन संशोधन होत आहे, या संशोधनाचा उपयोग शेती उत्पादनाच्या संदर्भात होत आहे आणि ते तुम्हा लोकांपर्यंत पोहोचायला हवे तोच खरा संशोधनाचा उपयोग आहे आणि म्हणून कृषिक सारखे कार्यक्रम हे संशोधकांनी केलेले काम पोहोचवण्यासाठी आणि तुम्हा लोकांना काय बदल होत आहेत, त्याचे वाचनाचे सूत्र काय आहे? हे समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त पर्याय आहेत.

एकदा यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला की, या देशाचे शेतीचे प्रश्न काय आहेत आणि किती आहेत त्यांनी उत्तर दिलं की, १० तोंडी रावण असतो तसे शेतीचे प्रश्न आहेत. तो एकच प्रश्न आहे असं नाही, पाण्याचा प्रश्न, जमिनीचा पोत कसा सांभाळायचा?, कोणते बियाणे चांगले कोणते नकली?, गुंतवणूक केल्यानंतर त्याला मिळणारी किंमत ही योग्य आहे का?, शेतीचा धंदा आज गत कसा होत आहे त्याबद्दलचे अनेक प्रश्न आणि या प्रश्नांची सोडवणूक करणे हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्यासारखे आहे. यात ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांची जबाबदारी अधिक आहे आणि म्हणून विशेषतः केंद्र सरकारची जबाबदारी अधिक असते. पण अलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदललेला आहे.

दिल्लीमध्ये कधी-कधी पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारच्या माणसांबरोबर मला चर्चा करण्याची संधी मिळते आणि शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न हा मी उपस्थित केल्यानंतर मला बोलतात, काहीही सांगतात तुम्ही पिकवणारे आम्ही खाणारे; या देशात पिकवणारे किती आणि खाणारे किती ? याचा जर अंदाज घेतला, तर पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि मी सांगत होतो की, पिकवणारा हा जर कर्जबाजारी झाला, तो संकटात गेला तर, खाणाऱ्यांना उपाशी राहावे लागेल.

मला आठवतंय त्या काळामध्ये मी मंत्री होतो आणि माझ्याकडे अन्न पुरवठा खाते होतं आणि त्या वेळेला दुष्काळ पडला, धान्य परदेशातून आले आणि ते धान्य ज्वारीच्या ठिकाणी निरं होतं आणि त्या निराची लाल भाकरी मला माहिती नाही तुमच्यापैकी कोणी पाहिली का? ती भाकरी खायचा प्रसंग केवळ उत्पन्न घटलं आणि दुष्काळ पडला म्हणून या देशांमध्ये आलेला होता आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर, शेतकऱ्याचे उत्पादन, त्याची उत्पादन क्षमता, त्याच्या उत्पादनाची किंमत, यावर कर्ज होऊ शकत नाही आणि म्हणून एक आंदोलन झाले. मी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडे गेलो होतो आणि कांद्याच्या किमती ढासळल्यात, त्याचा उत्पादन खर्च देखील निघत नव्हता; फक्त परदेशात कांदा पाठवला, तर किंमत मिळत होती, पण केंद्र सरकारने परदेशामध्ये कांदा पाठवायला ४०% ड्युटी बसवली.

मला आठवतंय की, मी शेती खात्याचा केंद्रात मंत्री होतो, कांद्याच्या किमती वाढल्यात; पार्लमेंटचे हाऊस सुरू झाले आणि विरोधी पक्षाचे भाजपचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून पार्लमेंटमध्ये आले आणि घोषणा सुरू केल्या की, शरद पवार इस्तीफ़ा दो । स्पीकरने विचारलं काय आहे ? कशासाठी या घोषणाबाजी चालू आहेत ? तर विरोधकांनी सांगितलं की, कांद्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्याला जबाबदार कृषिमंत्री आहे आणि म्हणून त्यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत.

त्यावर मला अध्यक्षांनी विचारलं तुम्ही खुलासा करा, मी त्यांना सांगितलं की, रोजच्या खाण्यामध्ये तुमचा कांद्याचा खर्च किती आहे ? तांदूळ, डाळी, ज्वारी, तेल, तिखट या सर्वांचा खर्च असेल, परंतु यात कांद्याचा किती खर्च आहे ? आणि एखाद्या दिवशी कांदा खाल्ला नाही, तर माणूस उपाशी राहिला असे होत नाही आणि म्हणून हा कांदा उत्पादक शेतकरी गरीब आहे आणि या गरीब शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळत असतील, तर लगेचच किमती थांबवण्यासाठी बंदी घाला ही मागणी मला मंजूर नाही. तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाहीतर काहीही करा, मी कांद्याची किंमत खाली येऊ देणार नाही, मी त्या शेतकऱ्याला त्याची किंमत मिळालीच पाहिजे त्यासाठी काहीही सहन करायला तयार आहे, शेवटी सर्वजण गप्प बसले आणि त्यांनी मान्य केले, असे विविध किस्से शरद पवारांनी माळेगावच्या कृषिक महोत्सवा दरम्यान सांगितले आहेत.

English Summary: Indian Agriculture Agricultural problems in the country sharad pawar news sheti samsaya
Published on: 20 January 2024, 12:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)