News

साखर उत्पादनात ब्राझील हा देश सर्वात अग्रेसर आहे. ब्राझील पाठोपाठ भार त हा देश साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर येतो.या वर्षीच्या गाळप हंगाम हा 30 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. या वर्षीच्या गाळप हंगामात देशातील साखर कारखान्यांनी 72. 3 लाख टन साखरेची निर्यात केली आहे.प्रत्येक वर्षी भारतात साखरेचे उत्पन्न वाढत आहे. यंदा च्या साली भारतातील सर्व साखर कारखान्यातून चक्क 72. 3 लाख टन एवढ्या साखरेची निर्यात झालेली आहे. ही सर्व माहिती साखर  व्यवसायात असलेल्या ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (ISTA)या संस्थेने दिली आहे.

Updated on 07 October, 2021 10:31 AM IST

साखर उत्पादनात ब्राझील हा देश सर्वात अग्रेसर आहे. ब्राझील पाठोपाठ भारत हा देश साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर येतो.या वर्षीच्या गाळप हंगाम हा 30 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. या वर्षीच्या गाळप हंगामात देशातील साखर कारखान्यांनी 72. 3 लाख टन साखरेची निर्यात केली आहे.प्रत्येक वर्षी  भारतात साखरेचे  उत्पन्न  वाढत आहे. यंदाच्या साली  भारतातील  सर्व साखर कारखान्यातून चक्क 72. 3 लाख टन एवढ्या साखरेची निर्यात झालेली आहे. ही सर्व माहिती साखर  व्यवसायात असलेल्या ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (ISTA)या संस्थेने दिली आहे.

यंदाच्या वर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेची कमतरता:

30 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या हंगामात आपल्या भारत देशाने इंडोनेशिया या देशाला सर्वाधिक साखर निर्यात केली आहे.तसेच 2020-21 साली एकूण निर्यातीपैकी 70.6 लाख टन साखर निर्यात झाली आहे. तसेच 1,66,335 टन एवढी साखर जनतेत तसेच साखर कारखाना यामध्ये दान केली जाते.तसेच पुढील वर्षी साखर हंगामात कमीत कमी 60  लाख  टनांपर्यंत   साखर देशातून निर्यात होईल असा अंदाज सुद्धा बांधला आहे. त्यामुळे आपल्या देशातील साखर उत्पादन चे प्रमाण वाढणार आहे.तसेच यंदाच्या वर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात  घट  झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेची कमतरता जाणवू शकते असा अंदाज सुद्धा मानला जात आहे.

थायलंडमध्ये सुद्धा साखरेचे उत्पादन हे दरवर्षीे वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यांचे उत्पादन हे दुप्पट वाढलेले आपल्याला दिसून येते आहे.परंतु भारताच्या तुलनेत सर्वसाधारण उत्पादनाच्या 30 ते 35 लाख टन हे त्यांचे उत्पादन कमीच राहणार आहे. तसेच थायलंड देशाची साखर ही जानेवारी 2022 मध्ये बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळं भारताला साखर  निर्याती  मध्ये मोठा फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. ब्राझील हा देश साखर उत्पादनात संपूर्ण जगात अग्रेसर आहे.परंतु ब्राझील मध्ये साखरेचे उत्पन्न जास्त असले तरी  जानेवारी  2022  नंतर आणि एप्रिल 2022 नंतरच ब्राझीलची साखर ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत येणार आहे.

त्यामुळे ब्राझील च्या आधी साखर निर्यातीचा फायदा हा भारतामधीलच साखर उत्पादक साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे वाढत्या उत्पादनाबरोबरच साखरेची निर्यातही मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात जबरदस्त फायदा होणार आहे. यंदा च्या वर्षी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम हा 15 ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे. त्या अंदाजावर गत महिन्यात मंत्री मंडळाची बैठक झाली असून यामध्ये हा निर्णय झाला आहे. 

English Summary: India will be the second largest exporter of sugar in the world
Published on: 07 October 2021, 10:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)