पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषदेत भारताने सांगितले की,देशाची सौर ऊर्जा क्षमता ही गेल्या सात वर्षात सतरा पट वाढली असून 45 हजार मेगावॅट इतकी झाली आहे
यामध्ये विशेष असे कि,जगाच्या लोकसंख्येपैकी 17 टक्के लोकसंख्या भारतात असूनही कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण हे जगाच्या तुलनेत केवळ चार टक्के आहे. असे भारताकडून सांगण्यात आले.
भारतातर्फे या समिटमध्ये अकरावी शेअरिंग ऑफ आयडियाजदरम्यान तिसरा द्विवार्षिक अपडेटेड रिपोर्ट सादर करण्यात आला.या रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार भारताने सन 2005 ते 2014 या कालावधीमध्ये जी डी पी उत्सर्जनाच्या तीव्रतेत24 टक्क्यांनी कपात केली आहे.
.तसेच सौर कार्यक्रमातही लक्षणीय वाढ नोंदवली आहे. यावेळी भारताच्या वतीने पर्यावरण मंत्रालयातील सल्लागार शास्त्रज्ञ जे.आर भट्ट यांनी सांगितले की, भारत जागतिक लोकसंख्येच्या 17 टक्के प्रतिनिधित्व करतो परंतु भारताचे एकूण कार्बन उत्सर्जन केवळ चार टक्के आहे.त्यासोबतच वार्षिक हरितगृह वायू उत्सर्जन केवळ पाच टक्के आहे.
सौर ऊर्जेच्या क्षमतेत सात वर्षात 17 पटीने वाढ
गेल्या सात वर्षांमध्ये भारताने सौरऊर्जेची क्षमता जवळपास 17 पटीने वाढवून ते आता 45 हजार मेगावॅट वर पोहोचली आहे. ग्लासगो येथे COP26हवामान शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की,भारत अक्षय ऊर्जेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. यावेळी बोलताना मोदी म्हणाले होते की 2030 पर्यंत भारतातील निम्म्याहून अधिक ऊर्जा ही हरित ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण होईल.
Published on: 08 November 2021, 09:25 IST