
drumstics
भारतातून शेवग्याची पावडर निर्यात करण्या ला चालना देण्यासाठी अपेडा खासगी संस्थांना आवश्यक त्या सगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी मदत करीत आहे. 29 डिसेंबर 2020 रोजी दोन टन प्रमाणित सेंद्रिय शेवग्याची पावडर अमेरिकेला पाठवण्यात आली.
या कार्यक्रमाला भारतीय सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम अंगमुथू हिरवा कंदील दाखवला.तेलंगणा येथील अपेडाच्या नोंदणीकृत निर्यातदारांनी पैकी एक मेसर्स मेडी कोंडा न्यूटनियन यांना नियोजनबद्ध मार्गाने निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाठबळ देण्यात आले आहे. कंपनीच्या मालकीच्या असलेल्या 240 हेक्टर क्षेत्रावर शेवग्याची झाडे असून त्यांना कंत्राटी पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले जाते.
हेही वाचा:व्वा ! ५०० एकरावर फुलवली कोथिंबिरीची शेती, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
या कंपनीने जवळजवळ चाळीस मेट्रिक टन शेवग्याच्या पानांची पावडर तयार करून ती अमेरिकेत निर्यात करण्याचा प्रस्तावित आराखडा तयार केला आहे. या कंपनीने गोंगलूर या तेलंगणामधील असलेल्या गावात शेवग्याच्या पानांवर प्रक्रिया करून उत्पादन करणारे केंद्र सुरू केले आहे.अपेडाच्या पाठिंबा ने जास्तीत जास्त शेवगा प्रक्रिया केंद्रे उभारली जात असून त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये या व्यापारात जास्तीचे वाढ होऊन त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
शेवगा त्याच्या वैद्यकीय गुणधर्मामुळे आणि आरोग्यदाय गुणधर्मामुळे विविध स्वरूपात वापरली जाते. जागतिक स्तरावर शेवग्याच्या उत्पादनाला मागणी असते.